google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरसह अन्य महापालिकेच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला ?

Breaking News

सोलापूरसह अन्य महापालिकेच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला ?

 सोलापूरसह अन्य महापालिकेच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला ?

ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत . राज्यातील सोलापूर , मुंबई , ठाणे , नाशिक , कोल्हापूर , पुणे , ठाणे , पिंपरी चिंचवड , नागपूर , कल्याण , डोंबिवली , नवी मुंबई , औरंगाबाद , वसई - विरार , उल्हासनगर , अकोला , अमरावती या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत . 


या महापालिकांची निवडणूक प्रक्रिया जलै तेप्रक्रिया जुलै ते ऑक्टोबरदरम्यान होतील , असे संकेत राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिले . त्यामुळे तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे . आरक्षणाशिवाय तातडीने निवडणूक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते . 15 दिवसात निवडणूक जाहीर करा ,


 असे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते . परंतु पावसाळ्यात निवडणुका घेणे कठीण असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले . कोकण आणि मुंबईत पूर परिस्थिती असते . त्यामुळेनिवडणुका घेणे अडचणीचे ठरू शकते , असे आयोगाने सांगितले . परंतु ज्या ठिकाणी कमी पाऊस असतो अशा ठिकाणी निवडणुका घेण्यास काय अडचण आहे ,


 असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता . आयोगाने 14 महापालिकांच्या आयुक्तांना पत्राद्वारे माहिती दिली आहे . त्यानुसार प्रभाग आणि आरक्षण सोडत , विधानसभा मतदारसंघनिहाय मतदाययादी जाहीर करणे आणि निवडणूक अशी प्रक्रिया असेल , असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे . निवडणुकीची मतदारयादी 7 जुलैपर्यंत जाहीर होणार असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे 

Post a Comment

0 Comments