निजामपूर ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्यासाठी केलेला खर्चच पाण्यात
सांगोला/प्रतिनिधी- शासनाने ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पेयजल योजना राबवली आहे. याच योजनेचा लाभ घेऊन निजामपूर गावातील ग्रामपंचायतने अंदाजे २० लाख रुपये पेक्षा जास्त खर्च करून पाण्याच्या टाक्या व वाड्यावस्त्यांवर पाईप लाईन करून घेतलेल्या आहेत
परंतु त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून ते काम अपूर्ण आहे . त्यामुळे या पाण्याच्या टाक्यामध्ये आजपर्यंत कधीही पाणी भरलेले नाही. गावात पाण्याच्या टाक्या असून सुद्धा पाणी मिळत नसलेमुळे या योजना लोकांना असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. या योजना ह्या लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आहेत
कि अधिकारी आणि ठेकेदार पुढारी यांना जगवण्यासाठी आहेत हाच प्रश्न लोकांसमोर उभा आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी टाक्या आहेत पण त्याला पाईप लाईन जोडलेल्या नाहीत, त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी दयनीय अवस्था होत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या गोष्टींमध्ये लक्ष घालून गावातील सरपंच व त्यांचे चेले यांची मनमानी थांबवावी. आणि लोकांना पिण्याचे पाणी वेळेवर कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करावा अशी गावातील जनतेची मागणी होत आहे.


0 Comments