Breaking News

लाखोचा गुटखा... अन इंदापूर पोलिसांनी दिला झटका... २४ लाख ७५ हजार रुपयांच्या गुटख्यासह २५ लाखाचा ट्रक इंदापूर पोलिसांनी केला जप्‍त...

 लाखोचा गुटखा... अन इंदापूर पोलिसांनी दिला झटका...


२४ लाख ७५ हजार रुपयांच्या गुटख्यासह २५ लाखाचा ट्रक इंदापूर पोलिसांनी केला जप्‍त...

 दिनांक १५ जून रोजी पहाटेच्या सुमारास इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटख्यावर व वाहतूक करणाऱ्या ट्रकवर महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. सदर कारवाई मध्ये २५ लाख ७५ हजार रुपये किमतीचा गुटखा व २५ लाख रुपयांचा वाहतूक करणारा ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधक केलेला गुटखा वाहतूक करणारा ट्रक कर्नाटक कडून पुण्याकडे जात असताना इंदापूर पोलिसांनी लोणी देवकर येथे या संशयित ट्रकची तपासणी केली असता इंदापूर पोलिसांना ट्रक मध्ये अवैध गुटखा दिसून आला. यामध्ये इंदापूर पोलिसांनी ट्रक चालक व मालक या दोघांवरती भारतीय कलम ३२८ व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. 


सदरची कारवाई ही डॉ. अभिनव देशमुख( पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), मिलींद मोहिते (अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग), गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी)  यांच्या मार्गदशनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, पो हवा अमोल खैरे, पो हवा सुनील बालगुडे, पोना महेंद्र पवार, पो ना मोहम्मद अली मड्डी, पोना बापूसाहेब मोहिते, पो ना सलमान खान, पो ना जगन्नाथ कळसाईत, पोलीस कॉन्स्टेबल विशाल चौधर, लक्ष्मण सूर्यवंशी, अकबर शेख, पोलीस मित्र महादेव गोरवे, शुभम सोनवणे, हनुमंत मोटे, भाऊ कांबळे, अनिल शेवाळे यांनी केली.

Post a Comment

0 Comments