Breaking News

कृत्रिम खतटंचाई : कृषी अधिकाऱ्यांचा इशारा जादा दर घेतल्यास परवाना रद्द

 कृत्रिम खतटंचाई : कृषी अधिकाऱ्यांचा इशारा जादा दर घेतल्यास परवाना रद्द

 खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची जाणीवपूर्वक कृत्रीम टंचाई निर्माण करून , या खतांची सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत . जिल्ह्यातील खते विक्रेत्यांनी जास्त दराने विक्री करू नये , अशी सूचना कृषी विभागाने सर्व विक्रेत्यांना दिली आहे .


 या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या खते विक्रेत्यांचा विक्री परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे . जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरू झाला आहे . त्यामुळे खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करत असतात . खरिपातील पेरण्यांबरोबरच उसासाठीही रासायनिक खते खरेदी करावी लागत आहेत 


यामुळे रासायनिक खतांची वाढती मागणी पाहता , काही विक्रेते हे अधिकाधिक नफा कमावण्याच्याउद्देशाने खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करून जास्त दराने विक्री करू लागले आहेत , अशा तक्रारी प्राप्त झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले . दरम्यान , केंद्र सरकारने एक एप्रिल २०२२ पासून युरिया ,डीएपी , एमओपी , २० : २० : ० : १३ , २४ : २४ : ० : ८५ , १ ९ : १ ९ : १ ९ , १०:२६:२६ , १२:३२:१६ , १४:३५:१४ , १४:२८:०० , १५:१५:१५ , १६:२०:०० : १३ , १६:१६:१६ , २८:२८:०० , १५ : १५ : १५ : ० ९ , १७:१७:१७ ,०८:२१ : २१ आणि रासायनिक ० ९ : २४ : २४ खतांच्या आदी किमती नव्याने निश्चित केल्या आहेत .


विविध खतांच्या निश्चित किमती ( प्रति बॅग , रुपयांत .... २६६ रुपये ५० पैसे १ हजार ३५० १ हजार २०० १ हजार ७०० १ हजार १०० १ हजार १ हजार ९ ०० १ हजार ९ ०० किमान १ हजार १५० ( कंपनीनिहाय वेगळा दर ) १ हजार ५७५ १ हजार ४४० १ हजार ४५० १ हजार ९ ०० १ हजार ४ ९ ५ १ हजार ५०० किमान १ हजार १२५ ते १ हजार ४०० १ हजार ४७५ १ हजार ७०० ते १ हजार ९ ०० १ हजार १०० १ हजार ३७५ ते १ हजार ४५० १ हजार २१० १ हजार ८५० १ हजार ९ ०० युरिया डीएपी ( एनएफएल वगळता ) डीएपी ( एनएफएल ) एमओपी एमओपी ( एनएफएल ) एमओपी ( कोरोमंडल ) २४:२४:०० २४ : २४ : ० : ८५ ( कोरोमंडल ) २० : २० : ० : १३ १ ९ : १ ९ : १ ९ १०:२६:२६ १२:२६:२६ १४:३५:१४ १४:२८:०० १५:१५:१५ १६ : २० : ०० : १३ १६:१६:१६ २८:२८:०० अमोनिअम सल्फेट १५ : १५ : १५ : ० ९ १७:१७:१७ ०८:२१:२१ ० ९ : २४ : २४


येथे नोंदवा तक्रार जिल्ह्यातील कोणीही खतविक्रेता निश्चित किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री करत असल्यास , त्याबाबतची तक्रार करण्यासाठी जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे . शेतकऱ्यांना या कक्षाच्या ०२०-२५५३७७१८ , २५५३८३१० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९ १५८४७ ९ ३०६ व ९ ४२३८७४०६७ या मोबाईल क्रमांकावर तक्रार करता येणार आहे . शिवाय dsaopune@gmail.com fahal adozppune @ gmail.com या ई - मेल आयडीवरही तक्रार नोंदविता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments