घेरडीत डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम
सांगोला तालुक्यातील घेरडी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सुरेखाताई पिंटूदादा पुकळे यांनी आपल्या निवडीनंतर गावात विकास कामांचा सपाटाच लावला असून, महिला व युवतीवर्गासाठी विशेष अशी कामे करून त्यांना स्त्री मुक्तीचे धडे दिले आहे.
सांगोला/ नारीशक्तीचा उद्धार करणाऱ्या घेरडी गावच्या सरपंच खऱ्याच, ध्येयवादी आहेत. गावातील दोनशे मुलींना कराटे प्रशिक्षण देवून त्यांना स्वरक्षणाचे धडे दिलेले आहेत. गावातील 16 मुलींनी राज्यभर नावलोकीक मिळविला आहे. यासह सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या शंभर महिला व युवतींचा सत्कार रविवार, 12 जून रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुरेखाताई पुकळे यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील घेरडी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सुरेखाताई पिंटूदादा पुकळे यांनी आपल्या निवडीनंतर गावात विकास कामांचा सपाटाच लावला असून, महिला व युवतीवर्गासाठी विशेष अशी कामे करून त्यांना स्त्री मुक्तीचे धडे दिले आहे. अशातच गावातील आश्रम शाळेत 1 मार्च 2022 पासून ते आतापर्यंत दोनशे युवतींना कराटे प्रशिक्षण देवून, स्वरक्षणाचे धडे दिले आहेत.
त्यानंतर यातील 16 मुलींनी राज्य व जिल्हा पातळीवर अनेक पदकेही मिळविली आहेत. त्याअनुषंगाने रविवार, 12 जुन 2022 रोजी आश्रम शाळेमध्ये यांच युवतींचा तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, कर्तत्वान माता यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख, जतच्या नगराध्यक्षा शुभांगीताई बनेंनवार, डीवायएसपी राजश्री पाटील, शोभा शिवाजीराव कालुंगे, सांगोल्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने, माजी सभापती राणीताई कोळवले, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या कल्पनाताई शिंगाडे, माजी पंचायत समिती सदस्य मायाक्का यमगर यांच्यासह अन्यवर महिला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments