google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पतीने गुप्तधनासाठी पत्नीवर केला अघोरी प्रयोग अन…!

Breaking News

पतीने गुप्तधनासाठी पत्नीवर केला अघोरी प्रयोग अन…!

 पतीने गुप्तधनासाठी पत्नीवर केला अघोरी प्रयोग अन…!

यवतमाळ : यवतमाळच्या पांढरकवडा जवळ असलेल्या केळापूरमध्ये गुप्तधनासाठी पतीने चक्क आपल्याच पत्नीवर अघोरी प्रयोग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.


पतीला गुप्तधन शोधण्याचे इतके वेड लागले की, त्याने चक्क अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याच्या मोहात स्वतःच्या पत्नीवर अनेक मांत्रिक प्रयोग केले. गुप्तधनासाठी पत्नीला अंगारा लावणे, लिंबू, हार टाकणे, माणसाची कवटी तिच्या गळ्यात टाकणे तसेच जडीबुटीचे औषध देऊन तिला जीवाने मारण्याचा प्रयत्न झाला.


परंतु, ही बाब पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने या नराधम पतीची कृत्य आपल्या आई-वडिलांना फोनवरून सांगितली.दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी तत्काळ केळापूर गाठून याबाबतची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य, प्रतिबंध व निर्मूलन आणि काळा जादू, हुंडाबंदी कायद्या अंतर्गत सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच घटनेतील सहाही आरोपी फरार झाले आहेत.

Post a Comment

0 Comments