google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुलीचा मृतदेह घेऊन आई ४ दिवस घरातच राहिली , दुर्गंधीमुळे लोकांनी तोडला घराचा दरवाजा

Breaking News

मुलीचा मृतदेह घेऊन आई ४ दिवस घरातच राहिली , दुर्गंधीमुळे लोकांनी तोडला घराचा दरवाजा

 मुलीचा मृतदेह घेऊन आई ४ दिवस घरातच राहिली , दुर्गंधीमुळे लोकांनी तोडला घराचा दरवाजा

मंड्या : कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक आई चार दिवस आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत राहिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हलहल्ली गावातील नागम्मा ही वृद्ध महिला तिची मुलगी रूपाच्या दुर्गंध पसरलेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाजवळ तिच्या घरात राहिली आणि झोपली होती. स्थानिक लोकांनी घराचा दरवाजा तोडला.


नगम्माची मुलगी रूपा घरातच मरण पावली होती, पण नगमाने हे कोणालाच उघड न करण्याचा निर्णय घेतला. तिने दरवाजे बंद केले होते आणि मृतदेहासोबत आत राहण्याचा निर्णय घेतला होता.


हा वास मृत उंदराचा असावा, असे सुरुवातीला स्थानिकांना वाटले. मात्र, आई आणि मुलगी दोघेही घराबाहेर न पडल्याने लोकांना संशय आला. रूपाला फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कॉलचं काहीच उत्तर आलं नाही. रूपाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. लग्नाच्या १० वर्षानंतर रूपा तिच्या पतीपासून विभक्त होऊन तिच्या आईच्या घरी परतली होती.

Post a Comment

0 Comments