तलवारीने सपासप २६ वार करत मुंडके केले धडावेगळे
क्रूरतेचा कळस : चुलत बहिणीला पळविल्याच्या रागातून घडली घटना
तुमसर (भंडारा) : चुलत बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तलवारीने एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ वार करून चक्क शिर धडावेगळे केले. क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना तुमसर येथे एका हॉटेलसमोर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पाहणाऱ्यांनाही अंगावर शहारे येतात. सोबतच क्रूरता गाठणाऱ्या तरुणांनाबद्दल घृणाही निर्माण होते.सचिन गजानन मस्के (वय ३४) रा. शिवाजीनगर तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कुलदीप मनोहर लोखंडे (२९), केतन दिलीप मदारकर (२८) आणि रंजीत सहदेव गभणे (३२) रा. तिघेही रा. शिवाजीनगर, तुमसर या आरोपीना अटक करण्यात आली.
सचिन आणि तीनही आरोपी यांच्यात मैत्री होती. एकमेकांचे मित्र असल्याने घरी येणे जाणे होते. त्यातच यातील एका आरोपीच्या बहिणीसोबत सचिनचे सूत जुळले. अचानक २७ मे रोजी सचिन त्या तरुणीला घेऊन पसार झाला. पोलिसांनी तरुणीसह सचिनला १ जून रोजी nagpur बसस्थानकावरून ताब्यात घेतले व घेतले. तरुणीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले, तर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावून सचिनला घरी पाठविले.
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सचिनसह तीन आरोपी देव्हाड़ी रोडवरील हॉटेलमध्ये गेले. तेथे जेवण आटोपून बाहेर पडल्यानंतर काळजाचा थरकाप उडेल अशा पद्धतीने सचिनचा निर्घृण खून केला. दुचाकीवर बसून असलेल्या सचिनवर प्रथम चाकूने मानेवर वार केला. खाली कोसळल्यावर कुलदीपने तलवारीने सपासप वार केले. तीन वारातच सचिनने प्राण सोडला. मात्र निर्दयीं आणि क्रूरतेने सचिन मृत्यूमुखी पडल्यानंतरही त्याच्यावर सपासप वार करून शिर धडापासून वेगळे केले.
तिघांनाही अटक
सचिन मस्के याचा खून केल्यानंतर तिघेही एकाच दुचाकीने घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, ही घटना, प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी रात्री शोध घेऊन कुलदीप लोखंडे, केतन मदारकर, रंजीत गभणे या तिघांना अटक केली. शनिवारी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळाला भेट दिली.
तर वाचला असता जीव
प्रेमप्रकरणात अपयश आल्याने सचिन दुःखी झाला होता. तुमसर सोडून जायचा त्याने निर्धार केला होता. मुंबईला जाण्यासाठी त्याने ३ जून रोजीचे रेल्वे आरक्षणही केले होते. मात्र, अचानक २ जूनच्या सकाळी सचिनने आरक्षण रद्द केले. आरक्षण रद्द केले नसते आणि मुंबईत गेला असता तर त्याचे प्राण वाचले असते.


0 Comments