google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला- मिरज रेल्वे गेट येथील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुले करा :- शहीद अशोक कामटे संघटना

Breaking News

सांगोला- मिरज रेल्वे गेट येथील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुले करा :- शहीद अशोक कामटे संघटना

 भविष्यात भुयारी रेल्वे मार्गावरील वाहतूक ही सोइची न होता गैरसोयीची होईल :- अशोक कामटे संघटना.


सांगोला- मिरज रेल्वे गेट येथील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुले करा :- शहीद अशोक कामटे संघटना

सांगोला (प्रतिनिधी) सांगोल्यातील मिरज रेल्वे गेट क्रमांक(32A)  परिसरातील भुयारी मार्ग तात्काळ सुरू करावे या मागणीचे पत्र शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक रेल्वे बांधकाम विभाग यांना देण्यात आले.

या भुयारी मार्गाचे गेल्या तीन महिन्यापासून काम सुरू असून गेलेला कालावधी पाहता या कालावधीत हे काम पूर्ण होणे गरजेचे होते पण तसे न होता येथील अडचणी वाढल्या आहेत ठेकेदार पुरेसे मनुष्यबळ न वापरता अगदी तुटपुंजे कामगारावर येथील काम सुरू आहे ,या कामास म्हणावी तितकी गती मिळाली नाही ,परिणामी पावसाळ्यात या भागातील अनेक नागरिकांची गैरसोय, प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत . शहरातील व बाहेरील लोकांना या कामामुळे आठ ते दहा किलोमीटर बाह्यवळण रस्त्याने जावे लागत आहे .मिरज रोड परिसरात अनेक छोटी मोठी व्यवसायिक ,एमायडिसी, सूतगिरणी ,अनेक मोठे उद्योग समूह ,शाळा कॉलेजेस आहेत या कामामुळे येथील व्यवसायवर मोठा परिणाम झाला आहे. जाणाऱ्या नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याच बरोबर हा मार्ग बंद असल्याने शहरातील बायपास रोड ची दुरावस्था अधिकच बिकट झाली आहे या भुयारी मार्गात पहिल्याच पावसात मोठा फज्जा उडालेला दिसून आला या भुयारी मार्गात कमीत कमी पंधरा ते वीस फूट पाणीसाठ्य असून' भविष्यात या मार्गावरील वाहतूक ही सोइची न होता गैरसोयीची होईल अशी परिस्थिती आहे', रेल्वे विभाग हे काम पूर्ण होण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या कामाची गती याप्रकारे राहिली तर पुढील 2 ते 3 महिने या कामासाठी लागू शकतात काम पूर्ण झाले तरी या बोगद्याचे फार मोठा फायदा  नागरिकांना होणार नाही ,केवळ चार ते पाच कामगारावर या मोठ्या बोगद्याचे काम अवलंबून असून रेल्वे विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात या मार्गाचे काम पूर्ण न केल्यास या भागातील नागरिकांच्यावतीने शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना रेल रोको आंदोलन करणार असल्याचे  सांगितले.

Post a Comment

0 Comments