शिवसेनेच्या एका आमदाराचे मत बाद ; आव्हाड , ठाकूर यांची मतं वैध
राज्यसभा निवडणुकीवरुन राज्यात मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे.पण, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांचे मत वैध्य धरण्यात आले आहे. तर सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे हे मत वैध धरण्यात आले आहे. त्यामुळे आता मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी आज मतदान पार पडलं.
सर्व आमदारांनी आज मतदान केलं. पण मतदानानंतर बराचवेळ झाला तरी मतमोजणीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा निकाल रखडला होता. अखेरीस निवडणूक आयोगाने बैठक घेतली आणि रात्री उशिरा याबद्दल निर्णय दिला आहे.
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. पण, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांचे मत वैध्य धरण्यात आले आहे. तर सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे हे मत वैध्य धरण्यात आले आहे. त्यामुळे आता मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपने राज्याच्या बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठवले होते. तसेच मतमोजणीत तीन मतं बाद करा, अशा आशयाचं पत्र भाजपने पाठवलं होतं. पण, आता निवडणूक आयोगाने एकच मत बाद केले आहे. त्यामुळे शिवसेनाला धक्का मानला जात आहे. पण महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.


0 Comments