Breaking News

कटफळ मध्ये वाळू माफियाचा सुळसुळाट विनापरवाना वाळूसह टेम्पो पोलिसांनी केला जप्त

 कटफळ मध्ये वाळू माफियाचा सुळसुळाट  विनापरवाना वाळूसह टेम्पो पोलिसांनी केला जप्त

 पोलिसांनी विनापरवाना अवैधरित्या चोरून वाळू भरताना चार हजार रुपये किमतीच्या अर्ध्या ब्रास वाळूसह ६० हजार रुपयांचा टेम्पो असा ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . 


ही कारवाई रविवार , १२जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ( कटफळ शेरेवाडी , ता . सांगोला ) येथे केली . याबाबत पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सोमनाथ दिलीप कोकरे ( रा . कटफळ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

तरीही प्रशासनाने योग्य दखल घेऊन त्वरित बेकायदेशीर वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सामान्य नागरिकांकडून दिला जात आहे

Post a Comment

0 Comments