पोलिसानेच केला महिलेची खून; मृतदेहसोबत २४ तास फिरवली गाडी!
उल्हासनगर – मधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका धाब्यावर एका वेगेनार गाडीमध्ये महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे. त्या प्रकरणात विठ्ठल वाडी पोलिसांनी सदर महिलेच्या हत्येप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य आरोपी सचिन खाजेकर हा ठाणे पोलीस मुख्यालयात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मृत महिला औरंगाबाद येथील रहिवासी आहे. तिचे वय पन्नास वर्षे असून ती पोलीस नाईक सचिन खाजेकर यांच्याकडे कर्ज वसुलीसाठी आल्याचे बोलले जात आहे. परंतु, खाजेकर हे गेल्या अनेक महिन्यापासून या महिलेकडून प्रचंड त्रस्त होते तसेच महिला सचिन खाजेकर यांना ब्लॅकमेल करत असल्याचे खाजेकर यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
दरम्यान, सदर महिलेचा मृतदेह गाडीत कुजण्यास सुरवात झाल्याने गाडीत दुर्गंधी पसरली होती. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सचिन खाजेकरने सदर महिलेस मारून गाडीत २४ तास फिरवत होते.


0 Comments