google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 थकबाकी साठी महावितरणची अनोखी योजना; वीज भरा अन् दुचाकी मिळवा

Breaking News

थकबाकी साठी महावितरणची अनोखी योजना; वीज भरा अन् दुचाकी मिळवा

 थकबाकी साठी महावितरणची अनोखी योजना; वीज भरा अन् दुचाकी मिळवा 
 महाराष्ट्र- जर तुम्ही महावितरणचे वीज बिल आणि थकबाकी नियमित भरत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक दुचाकी, टीव्ही, मोबाईल, फ्रिज असे अनेक बक्षीस मिळू शकते. विज बिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि प्रत्येक महिन्याला वीज बिल भरण्याची सवय लागावी, या उद्देशाने महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी बक्षिस योजना आणली आहे. 1 जुनपासून सुरू झालेल्या या योजनेत दर महिन्याला बक्षिसे जिंकण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.


नियमित वीजबिल व थकबाकी भरण्यासाठी महावितरण नागरिकांना वारंवार आवाहन करते. परंतु, अनेक ग्राहक वेळेवर बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत आहे. अनेकदा अशा ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई महावितरणला करावा लागतो. विज बिल वेळेवर न भरणाऱ्या ग्राहकांना पुढील तसेच विलंब शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळावा, घरगुती ग्राहकांनी वीज बिल भरण्यास स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि त्यांना प्रत्येक महिन्याला बिल‌ भरण्याची सवय लागावी यासाठी ही बक्षीस योजना महावितरण सुरू केली आहे.

Post a Comment

0 Comments