google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

Breaking News

पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

 पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

May 29, 2022 2:07 PM

रविवार,२९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केले आहे. यावेळी २६ मे रोजी देशातील मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे ‘मन की बात’ मधून पंतप्रधान मोदींनी देशवासियांचे आभार मानले आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी यावर्षीच्या योग दिनाची थीम सांगितली आहे. ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’, अशी यावर्षीची योग दिनाची थीम असणार आहे असं पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.


२१ जूनला देशात योग दिवस साजरा केला जातो. यावर्षी योग दिवसाची ‘योग फॉर ह्युमॅनिटी’ अशी थीम असणार आहे. पंतप्रधान मोदींनी भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्यांनी योग दिनाचा भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. योगाला तुमच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवा असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.


तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जपान दौऱ्यासंदर्भात देखील सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी जपानला गेलो असता तेथील कार्यक्रमांमध्ये अनेक व्यक्तींना भेटण्याचा योग आला. हे नागरिक जपानचे असले तरी त्यांच्या मनात भारताप्रती कमालीची ओढ आणि प्रेम दिसले, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments