संगेवाडी परिसरात ' चिकुन गुनियाचे ' थैमान कोरोनानंतर नव्या साथरोगामुळे नागरिक वैतागले ; आरोग्य विभागाचे मात्र दुर्लक्ष
सांगोला : संगेवाडी ( ता . सांगोला ) येथे चिकुन गुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत . एकीकडे चिकुन गुनियाने नागरिक त्रस्त असताना आरोग्य विभागाचे मात्र याकडे पूर्णतः दूर्लक्ष होत आहे . गेल्या काही दिवसांपासून परिसरात चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असलेले अनेक रुग्ण आढळून येत आहेत . अनेक जण सांधेदुखी , ताप यासारख्या आजाराने त्रस्त आहेत .
चिकुनगुनिया हा तापाचा आजार आहे . ताप हा साधारण तीन ते चार दिवस असतो . ताप थंडी वाजून येऊ शकते . सोबत डोकेदुखी , अंगदुखी , मळमळ होणे , उलटी होणे , पुरळ येणे इत्यादी लक्षणं दिसू शकतात . पण तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे सांधेदुखी . सांधेदुखी जोरदार असते . हातापायाचेछोटे आणि मोठे सगळेच सांधे दुखू शकतात .
सांध्यांवर सूज सुद्धा येऊ शकते . हे दुखणं इतकं त्रासदायक असतं की , रुग्ण हवालदिल होतात . चिकुनगुनिया ह्या आफ्रिकन शब्दाचा अर्थ ( दुखण्याने ) वाकून गेलेला असा होतो . ही सांधेदुखी काही दिवस असते व ताप कमी झाल्यावर हळूहळू कमी होते . परंतु काही रुग्णांमध्ये ही सांधेदुखी बराच काळ टिकू शकते . आरोग्य विभाग करतय तरी काय .. गावात अनेक रुग्ण गेल्या काहीदिवसांपासून चिकुनगुनिया सदृश्य लक्षणांनी त्रस्त आहेत .
एका घरातील अनेक जणांना अशी लक्षणे दिसू लागल्याने दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागत आहे . परंतु रुग्णसंख्या वाढत असली तरी आरोग्य विभागाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे . नागरिकांनाकोणती काळजी घ्यावी . हा आजार होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्यात किंवा झाल्यानंतर कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने आरोग्य विभागाचे काम तरी काय आहे असा प्रश्न सामान्यजन विचारत आहेत .


0 Comments