तुमच्या खिशातील 500, 2000 रुपयांच्या नोटा बनावट तर नाही ना..?‘आरबीआय’चाधक्कादायक रिपोर्ट..!
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, तसेच बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढल्याने मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर 1000 रुपयांची नोट कायमस्वरुपी बंद करुन 500 व 2000 रुपयांच्या नव्या नोटा छापण्यात आल्या..
मोदी सरकारने नव्या नोटा बाजारात आणल्यावर चलाख घोटाळेबाजांनी त्यांच्याही बनावट नोटा तयार केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या 2020-21च्या अहवालातून ही बाब समोर आलीय.. विशेष म्हणजे, बनावट नोटांमध्ये 500 रुपयांच्या नोटेचे प्रमाण सर्वाधिक आहे. या नोटा हुबेहुब खऱ्या नोटांसारख्याच दिसत असल्याने अनेकांची फसवणूक होते..
बनावट नोटांचे प्रमाण
500 रुपये (नवे डिझाईन) : 101 टक्के
2000 रुपये : 54.6 टक्के
50 रुपये : 28.7 टक्के
100 रुपये : 16.7 टक्के
10 रुपये : 16.4
20 रुपये : 16.5
200 रुपये : 11.7 टक्के
विशेष म्हणजे, नोटाबंदी करताना 1000 हजारांची नोट कायमची बंद करण्यात आली होती. असे असताना, ताज्या अहवालात सदोष नोटांची आकडेवारी प्रसिद्ध करताना, त्यात 1000 रुपयांच्या 11 बनावट नोटा छापल्याचा उल्लेख आहे.
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील घडामोडींची माहिती शिखर बँकेने अहवालाद्वारे प्रसिद्ध केलीय. त्यानुसार, बॅंकांच्या निदर्शनास येणाऱ्या या नोटा नव्या डिझाईनमधील आहेत. रिझर्व्ह बॅंकेत ज्या बनावट नोटा जमा झाल्या, त्यांचे प्रमाण आधीच्या वर्षीच्या तुलनेत 6.9 टक्क्यांनी वाढलेय, तर अन्य बँकांत त्यांचे प्रमाण तब्बल 93.1 टक्के इतके आहे.
अशी ओळखा 500 रुपयांची बनावट नोट
नोट दिव्यासमोर ठेवल्यास 45 अंशाच्या कोनातून पाहिल्यास देवनागरीत 500 लिहिलेलं दिसते.
महात्मा गांधींचे चित्र अगदी मध्यभागी दाखवले आहे. भारत व India ही अक्षरे दिसतील.
नोट हलकेच वाकवली, तर सिक्युरिटी थ्रेडचा रंग हिरव्यापासून ‘इंडिगो’मध्ये बदलताना दिसेल.
जुन्या नोटेच्या तुलनेत गव्हर्नरची स्वाक्षरी, हमी कलम, वचन खंड आणि RBI लोगो उजव्या बाजूला सरकले आहेत.
महात्मा गांधींचे चित्र व इलेक्ट्रो टाइप वॉटरमार्क दिसेल.
नोटेच्या वरच्या बाजूला डावीकडे नि तळाशी उजवीकडे संख्या डावीकडून उजवीकडे मोठी होत जाते.
500 क्रमांकाचा रंग हिरवा ते निळा होत जातो..
उजवीकडे अशोक स्तंभ आहे. उजव्या बाजूला 500 लिहिलेले वर्तुळ बॉक्स, उजव्या आणि डाव्या बाजूला 5 ब्लीड रेषा आणि अशोक स्तंभाचे प्रतीक, रफल प्रिंटमध्ये महात्मा गांधींचे चित्र.
नोट छापण्याचे वर्ष लिहिलेले असते. ‘स्वच्छ भारत’चा लोगो घोषवाक्यासह छापला आहे.
मध्यभागी एक भाषा फलक आहे. भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे चित्र छापलेले आहे.
बनावट नोट मिळाल्यास..
तुम्हाला नोटेबाबत संशय आल्यास बँकेत जाऊन मशीनद्वारे त्याची सत्यता पडताळून पाहा. नोट बनावट निघाल्यास, स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करा. बनावट नोट व्यवहारांत आणणे किंवा ती फिरवणे हाही गुन्हा आहे.


0 Comments