google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डिकसळमध्ये फॉरेस्टजवळचा डोंगर पेटला

Breaking News

डिकसळमध्ये फॉरेस्टजवळचा डोंगर पेटला

 डिकसळमध्ये फॉरेस्टजवळचा डोंगर पेटला 

सूर्यदेव अक्षरशः कोपलाच आहे. अशातच सांगोला वनपरिक्षेत्रातील डिकसळ हद्दीतील फॉरेस्ट पेटले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आगीत जळालेली आहे. गावच्या पश्चिम दिशेला असलेल्या इंगोले- पवार वस्तीवरील वनक्षेत्र पेटले असून शेजारच्या जत तालुक्यातील डोंगर पेतल्याने त्याचा वणवा या फॉरेस्टमध्ये आला असल्याचे अनेकांनी सांगितले.


जत तालुक्यातील आवंढीचे फॉरेस्ट पेटले अन् त्याची धग लागून सांगोला तालुक्यातील डिकसळ हद्दीतील मालकी हक्काचा डोंगरही यात पेटला. मात्र, एकीकडे डोंगर पेटला असताना हद्द नेमकी कोणाची यावरून वन विभागात काही काळ वाद पेटल्याचे दिसून आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली. त्यामुळे वृक्ष संपदा वाचली. मात्र यात अनेक झाडांना झळ पोहोचली आहे.


फॉरेस्ट हद्दीला लागून असलेल्या अशोक करताडे, मधू करताडे यांच्या रानातील डोंगर पेटला. खरे तर आवंढी हद्दीतील फॉरेस्ट पेटले. त्याचा वणवा याच फॉरेस्टला लागून असलेल्या मालकी हक्कातील डोंगर पेटला. पण वेळीच आग विजविल्याने हा अनर्थ टाळला.


“पळा पळा डोंगर पेटला, पण कोण विझवणार?” अशी अवस्था डिकसळकरांची झाली आहे. शनिवार, 6 मे रोजी रात्री 9 वाजता सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील इंगोले-पवार वस्तीवरील 10 एकरावरील डोंगर पेटला. जोराचा भडका उडाला.


सूर्यदेव अक्षरशः कोपलाच आहे. अशातच सांगोला वनपरिक्षेत्रातील डिकसळ हद्दीतील डोंंगर पेटले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आगीत जळालेली आहे. गावच्या पश्चिम दिशेला असलेल्या इंगोले- पवार वस्तीवरील वनक्षेत्र पेटले असून शेजारच्या जत तालुक्यातील डोंगर पेतल्याने त्याचा वणवा या फॉरेस्टमध्ये आला असल्याचे अनेकांनी सांगितले.

त्यामुळे डिकसळ हद्दीतील डोंगर पेटल्याने मोठे नुकसान झाले आहे. खरे तर सध्या उन्हाळ्याचे दिवस असून या वणाचे राखण कोणीच करीत नाही.


त्यामुळे हे वणवे पेटत आहेत. यापूर्वीही तालुक्यात अशा अनेज घटना घडल्या पण वन विभाग याची दखल घेत नाही. आज शनिवार रात्री लागलेल्या आगीमुळे अनेक वृक्ष जळाले असून, मोठे नुकसान झाले आहे. याची कल्पना मात्र या विभागाला नाही. येथेच मोठ्या प्रमाणात वन्यप्राणीही आहेत. पण कोण जाणे किती नुकसान झाले आहे.


या आगीत लिंब, खैर, पळस, बाभूळ यासह विविध प्रकारची झाडे, झुडुपे जळाली आहेत.

Post a Comment

0 Comments