google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजकीय नेत्यांकडे कोट्यवधींची वीजबिले थकीत..! कोणत्या नेत्याकडे किती रुपयांची थकबाकी..? वाचा

Breaking News

राजकीय नेत्यांकडे कोट्यवधींची वीजबिले थकीत..! कोणत्या नेत्याकडे किती रुपयांची थकबाकी..? वाचा

 राजकीय नेत्यांकडे कोट्यवधींची वीजबिले थकीत..! कोणत्या नेत्याकडे किती रुपयांची थकबाकी..? वाचा


थकित वीजबिलासाठी महावितरणकडून सामान्य नागरिकांवर कठोर कारवाई केली जाते. बिल भरण्यास थोडा जरी विलंब झाला, तरी लगेच वीज कनेक्शन तोडले जातात. कारवाईच्या भीतीने सामान्य माणूस पोटाला चिमटा घेऊन वीजबिल भरतो.. मात्र, राज्यातील मंत्री, आमदार- खासदारांनी लाखो रुपयांची वीजबिल थकवल्याचा प्रकार समोर आला आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, रावसाहेब दानवे, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह राज्यातील जवळपास 372 आमदार, खासदार, मंत्र्यांकडे वीजबिलाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे स्पष्ट झालंय. या अति महत्वाच्या 372 ग्राहकांकडे 30 एप्रिल 2022 पर्यंत एक कोटी 27 लाखांची थकबाकी असल्याची यादी ऊर्जा विभागाने जाहीर केलीय.


सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांचे एक-दोन महिन्याचं घरगुती वीजबिल थकलं, तरी महावितरण कार्यालयाची माणसे तत्परतेनं वीज कनेक्शन कापण्यासाठी येतात. मग, या ‘व्हीआयपी’ थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यासाठी महावितरण तत्परता दाखवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.


कोणाकडे किती थकबाकी

उपमुख्यमंत्री अजित पवार-  25 हजार रुपये

दिलीप वळसे-पाटील – 3 हजार 541 रुपये

आरोग्यमंत्री राजेश टोपे – 4 लाख रुपये

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात- 10 हजार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले- 2 लाख 63 हजार

राज्यमंत्री विश्वजित कदम- 20 हजार रुपये

श्रीमंत युवराज संभाजीराजे- 1 लाख 25 हजार

माजी मंत्री सुभाष देशमुख- 60 हजार रुपये

भाजप आमदार जयकुमार गोरे- 7 लाख रुपये

माजी गृहमंत्री अनिल देशमुख – 2 लाख 25 हजार

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे – 70 हजार रूपये

आमदार समाधान आवताडे- 20 हजार

आमदार राजेंद्र राऊत, बार्शी- 3 लाख 53 हजार

आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबीयांचे 22 कनेक्शन – 7 लाख 86 हजार

खासदार रणजितसिंह निंबाळकर – 3 लाख रुपये

आमदार संग्राम थोपटे- 1 लाख रुपये

माजी खासदार प्रतापराव जाधव- 1 लाख 50 हजार


शिवसेना आमदार सुहास कांदे- 50 हजार रुपये

आमदार रवी राणा – 40 हजार रुपये

आमदार वैभव नाईक – 2 लाख 80 हजार रुपये

माजी मंत्री विजयकुमार गावित- 42 हजार रुपये

माजी आमदार शिरीष चौधरी- 70 हजार रुपये

मंत्री संदीपान भुमरे- 1 लाख 50 हजार रुपये

खासदार रजनीताई पाटील- 3 लाख रुपये

आमदार प्रकाश सोळंके- 80 हजार रुपये

आमदार संदीप क्षीरसागर- 2 लाख 30 हजार रुपये


राज्यमंत्री संजय बनसोडे- 50 हजार रुपये

आमदार अशिष जयस्वाल- 3 लाख 36 हजार रुपये

आमदार महेश शिंदे- 70 हजार रुपये


माजी मंत्री सुरेश खाडे – 1 लाख 32 हजार रुपये

सुमन सदाशिव खोत- 1 लाख 32 हजार रुपये

Post a Comment

0 Comments