google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गॅस सिलिंडरचा ट्रक पलटी झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू!

Breaking News

गॅस सिलिंडरचा ट्रक पलटी झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू!

 गॅस सिलिंडरचा ट्रक पलटी झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू!

नाशिक: हरसूलच्या वाघेरा घाटरस्त्यावर नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाला असून गॅस सिलिंडरच्या ट्रकखाली दबून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्गे समोर आले आहे. 

रेखा भोये असे महिलेचे नाव असून, त्या अपघातसमयी घरासमोरील अंगण झाडत होत्या. ही घटना चिंचवडजवळील नाकेपाडा वस्तीच्या वळणावर घडली आहे . या अपघातात चालक गंभीर जखमी आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथून स्वयंपाकाचे गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक हरसूलकडे जात होता. वाघेरा घाटाच्या पायथ्याशी ट्रक आला असता, चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. 

त्याचवेळी रस्त्यालगतच्या घरासमोरील अंगण झाडणार्‍या रेखा अमोल भोये या महिलेच्या अंगावर तो ट्रक पलटी झाल्याने त्या जागीच तिचा मृत्यू झाला.दरम्यान, चालक अशोक पोपट शिंदे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत रेखा भोये या आंबा निर्यात करणारे प्रगत शेतकरी व शिक्षक अमोल भोये यांच्या पत्नी आहेत. रेखा यांच्या दुर्दैवी मृत्यूने चिंचवडसह हरसूल परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments