सोलापूर सांगोला तालुक्याचे दिवंगत लोकप्रिय आमदार मा. गणपतरावजी देशमुख अर्थात आबासाहेब यांची छबी असलेले डाँ बाबासाहेब देशमुख यांना लोकांनी अक्षःरशा डोक्यावर घेतले आहे..
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय दिवंगत आमदार गणपतरावजी देशमुख अर्थात आबासाहेबांच्या दुःखद निधनांने सांगोल्यातील जनतेवरती दुःखाचा डोंगर कोसळला होता.त्यातुन हि जनता सावरत असताना दिवंगत आबासाहेबांचे नातु डाँ बाबासाहेब देशमुख यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते.
ज्या जनतेने पंन्नास पंच्चावन्न वर्षे दिवंगत आबासाहेबांनवरती विश्वस ठेऊन प्रेम केले आहे.त्या जनतेच्या सेवेसाठी मी पुढील आयुष्य घालवणार असलेचे डाँ बाबासाहेब देशमुख यांनी जाहीर केले आणि तालुक्यातील जनतेमध्ये नवा जोश संचारला आहे तरुणाई जोशाने कामाला लागली आहे.गावोगावी वाडी-वस्तीवरती डाँ बाबासाहेबांचे नांव घराघरामध्ये पोहचले आहे.
राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या असोत ,धार्मिक कार्यक्रम असोत,सांस्कृतिक कार्यक्रम ,लग्न समारंभ, वाढदिवस,वस्तुशांती.. इत्यादी कार्यक्रमामध्ये डाँ बाबासाहेब देशमुख हे उपस्थित राहुन सहभाग नोंदवत आहेत.अशा कार्यक्रमामध्ये तरुण कार्यकर्त्याबरोबर वयोवृध्द नागरीकसुध्दा डाँ बाबासाहेब देशमुख यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी करताना पहावयास मिळत आहेत.
काही कार्यकर्ते तर गजीढोल कार्यक्रम असो ,लग्नसभारंभ असो अशा कार्यक्रमामध्ये डाँ बाबासाहेब देशमुख यांना घोड्यावरती बसवुन फटाक्याच्या आतषबाजीत व हालग्याच्या निनादात धुमधडाक्यात स्वागत करीत आहेत.काही कार्यक्रमामध्ये डाँ बाबासाहेब देशमुख यांनी बोलण्यासाठी हातात माईक घेतला असता लगेच गर्दीमध्ये शांतता पहावयास मिळत आहे.
तरुण वर्ग अक्षरशा त्यांच्या अभ्यासुवृत्तीला ,शांतसुस्वभावाला भुलला आहे.काही जुणी जाणती मंडळी तर दिवंगत आबासाहेबांनसारखेच डाँ बाबासाहेब दिसतात,बोलतात, हावभाव करतात असे कुतुहलालने बोलताना दिसत आहेत.एवढ्या कमी कालावधीत एवढा मोठा जनसंपर्क तयार केलेला राज्यातील हा एकमेव तरुण नेता असेल असे म्हटलेतर वावगे ठरणार नाही.
डाँ बाबासाहेब देशमुख यांनी हजारो रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य केले आहे.अडचणीच्या वेळी ते अहोरात्र धावून जात आहेत.कुठल्याही कार्यालयातील काम ते ताबडतोब फोन लावुन मार्गी लावत आहेत.विज,पिण्याचे पाणी यासाठी त्यांनी ते सतत आग्रही असताना दिसत आहेत.अशा कितीतरी कामातुन त्यांच्या नेतृत्व गुणाची पारख तालुक्यातील जनतेने केल्यामुळे तर लोक डाँ बाबासाहेबांना डोक्यवरती घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.अस शेतकरी कामगार पक्ष प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी यांना बोलताना सांगितले


0 Comments