google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ.राजश्री हरी सरगर यांची बिनविरोध निवड.

Breaking News

कोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ.राजश्री हरी सरगर यांची बिनविरोध निवड.

 कोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ.राजश्री हरी सरगर यांची बिनविरोध निवड.

कोळा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील

सांगोला तालुक्यातील सर्वात मोठे गाव आणि ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या कोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ. राजश्री हरी सरगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सौ. राजश्री सरगर आपल्या प्रभागातून बिनविरोध निवडून आल्या होत्या. माजी सरपंच वैशाली मारुती सरगर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. या पदासाठी सौ. राजश्री सरगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मंडल अधिकारी नाईकनवरे जाहीर केले. ही निवडणूक सोमवार दि. २३ मे रोजी कोळा ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गावाच्या संतुलित आणि सर्वसमावेशक विकासासाठी व गावातील शांतता व एकता कायम राहावी म्हणून सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करावी असे कोळावासियांना आवाहन केले होते. यानुसार, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सर्व नेतेमंडळीनी पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध पार पाडली. यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीतात्या आलदर, माजी ग्रामपंचायत सदस्य बिरा आलदर कुंडलिक आलदार सर आदीसह सर्व पक्षाच्या नेतेमंडळींनी विशेष प्रयत्न केले.


गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष प्रणित आघाडीने कोळा ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. पहिल्या वर्षी शेतकरी कामगार पक्षाच्या सौ वैशाली मारुती सरगर यांना सरपंच पदाचा मान मिळाला होता त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ राजश्री हरी सरगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावात गुलाल उधळून व एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला व नूतन सरपंचाचे गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी सचिन देशमुख, विलास देशमुख, मारुती सरगर, तुकाराम दादा आलदर, रामा आलदर, पै. हरी सरगर, दादासाहेब कोळेकर, बापूसाहेब कोळेकर, ज्येष्ठ नेते शिवाजी कोळेकर, लक्ष्मण सरगर, कोळा गावचे माजी सरपंच शहाजी हातेकर आदी प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


नूतन सरपंच सौ राजश्री हरी सरगर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देत सांगोला तालुक्यातील सर्वात मोठे गाव आणि ग्रामपंचायत असलेल्या कोळा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. गावाच्या सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासासाठी शासनाकडून तसेच जिल्हा नियोजन मंडळयांच्याकडून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी पाठपुरावा करून आणि कोळा गावाला विकासाचे रोल मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही शेवटी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments