google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

Breaking News

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

 राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

सांगोला/प्रतिनिधी ःपु. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 30 मे रोजी विविध स्पर्धांचे आयोजन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


यामध्ये निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून त्यासाठी 20 मिनीटांचा वेळ देण्यात आला आहे. निबंध स्पर्धेमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र, मल्हारराव होळकर यांचे जीवन चरित्र हे विषय असणार आहेत. या निबंध स्पर्धेसाठी इ. पाचवी ते सातवी मुले/मुली व इ. आठवी ते दहावी मुले/मुली असा खुला गट असणार आहे.


यानंतर रांगोळी स्पर्धेसाठी 1 तासांचा वेळ देण्यात आला असून यामध्ये झाडे लावा झाडे जगवा, कोरोना महामारी, पाणी अडवा पाणी जिरवा, स्त्रीभ्रूण हत्या असे विषय असून ही स्पर्धा खुल्या गटांतील महिलांसाठी असणार आहे.


तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी पाच ते सात मिनीटांचा वेळ देण्यात येणार असून यामध्ये अहिल्याबाई होळकर यांची राजकीय कारकिर्द, स्त्री स्वातंत्र्य, देशाच्या आर्थिक सक्षमीकरणात महिलांचे योगदान, आदर्श व्यक्तीमत्व भाई गणपतराव देशमुख असे विषय देण्यात आले आहेत. यामध्ये पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी खुला गट मुले/मुली व महिला खुलागट यांसाठी ठेवण्यात आली आहे.


सदरच्या सर्व स्पर्धा सोमवार दि. 30 मे रोजी पु. राजमाता अहिल्यादेवी होळकर बगीचा याठिकाणी सकाळी सकाळी 11 वाजल्यानंतर सुरू होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Post a Comment

0 Comments