google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील सोनंद येथे दि.२३/०५/२०२२ रोजी महाराजस्व अभियान राबविणेत येत आहे . तहसीलदार मा. अभिजीत सावर्डेकर पाटील...

Breaking News

सांगोला तालुक्यातील सोनंद येथे दि.२३/०५/२०२२ रोजी महाराजस्व अभियान राबविणेत येत आहे . तहसीलदार मा. अभिजीत सावर्डेकर पाटील...

 सांगोला तालुक्यातील सोनंद येथे  दि.२३/०५/२०२२ रोजी महाराजस्व अभियान राबविणेत येत आहे . तहसीलदार मा. अभिजीत सावर्डेकर पाटील...


मा.महाराष्ट्र शासन यांचेकडील महत्वपुर्ण उपक्रम अंतर्गत महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम , गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेत येत आहे . महाराजस्व अभियान या महत्वपुर्ण उपक्रमांतर्गत मौजे सोनंद , लक्ष्मीदेवी इंग्लीश मेडीयम हायस्कुल , 


सोनंद ता . सांगोला जि . सोलापूर येथे दिनांक २३/०५/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत विस्तारित समाधान योजना राबविणेत येणार आहे . महाराजस्व अभियान या कामी तालुक्यातील सर्व खातेप्रमुख अधिकारी व त्यांचे कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत . 


या अनुषंगाने लोकाभिमुख योजना राबविणेचे असलेने प्रत्येक खातेअंतर्गत असणारे योजनांची लाभार्थी निवड सदर शिबीरात होणार आहे . तरी या कामी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी उपस्थित राहुन सदर योजनांचा लाभ घेणेत यावा असे आवाहन तालुका प्रशासन यांचे वतीने करणेत येत आहे . 


Post a Comment

0 Comments