Breaking News

इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक, 23 वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू

 इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक, 23 वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू 

इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागून युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये घडली आहे. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे शुक्रवार (20 मे) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.


शिवानी अनिल पाटील (वय 23, रा. म्होप्रे, ता. कराड) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, म्होप्रे येथील युवती शिवानी पाटील ही आपल्या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यासाठी गेली असता तिला अचानकपणे शॉक लागला. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तिला त्वरीत उपचारासाठी कराडला रुग्णालयात हलवले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. हा शॉक नेमका कसा लागला याचा देखील आता पोलीस तपास करणार आहेत. या प्रकरणाची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खाडे करत आहेत.

Post a Comment

0 Comments