google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केवळ ४० रुपयांसाठी ५ मित्रांनी मिळून केली मित्राची हत्या!

Breaking News

केवळ ४० रुपयांसाठी ५ मित्रांनी मिळून केली मित्राची हत्या!

 केवळ ४० रुपयांसाठी ५ मित्रांनी मिळून केली मित्राची हत्या!

उत्तराखंड : उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमध्ये फक्त ४० रुपयांसाठी ५ मित्रांनी मिळून एका मित्राची हत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी सद्दाम आणि नवाब या दोघांमध्ये कचऱ्यांच्या पैशांवरून वाद झाला. त्यामुळे नवाबने त्याच्या मैत्रिण आणि ३ मित्रांच्या मदतीने सद्दामला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृत सद्दामचा चेहरा चाकूने वार करत विद्रूप केला. त्याच्यावर हल्ला करताना विटांचाही वापर केला. हत्या केल्यानंतर मृतदेह हायवेजवळील जंगलात फेकून दिला.


दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पुरावे गोळा करत आरोपीचा माग घेत दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करून त्यांच्याजवळील हत्यारं जप्त केली. कचराच्या ४० रुपयांवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. तर ३ आरोपी अद्याप फरार आहे.

Post a Comment

0 Comments