google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार..बायकोचा कुदळीने खून करून मुलाला आंब्याच्या झाडाला दिला गळफास

Breaking News

धक्कादायक प्रकार..बायकोचा कुदळीने खून करून मुलाला आंब्याच्या झाडाला दिला गळफास

 धक्कादायक प्रकार..बायकोचा कुदळीने खून करून मुलाला आंब्याच्या झाडाला दिला गळफास


नगर जिल्ह्यात एक थरकाप उडवून टाकणारी घटना घडलेली असून श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे चितळी रस्त्यावर कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून करून आपल्या मुलाला देखील आंब्याच्या झाडाला गळफास दिल्याची संतापजनक घटना उघडकीला आली आहे. सदर घटनेनंतर मयत महिलेच्या माहेरच्या लोकांनी संतप्त होत आरोपीच्या भावाचे घर पेटवून दिले मात्र सुदैवाने घरात कोणी नसल्याने आणखीन काही दुर्घटना घडली नाही.


उपलब्ध माहितीनुसार, अक्षता बलराम कुदळे ( वय 28 ) व शिवतेज बलराम कुदळे ( वय साडेचार वर्ष ) अशी मयत मायलेकरांची नावे असून बलराम कुदळे हा पत्नी आणि त्याचा मुलगा यांच्यासोबत गोंधवणी येथे राहत होता आणि मिळेल ते काम करून कुटुंब चालवत होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच बलराम आणि अक्षदा यांच्यात वाद सुरू झाले आणि ते वेगळे राहू लागले त्यानंतर त्यांना मुलगा झाला आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले.


रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात भांडण झाले त्यावेळी संतप्त झालेला बलराम याने प्रथम अक्षताच्या डोक्यात कुदळ मारून तिचा खून केला आणि त्यानंतर मुलगा शिवतेज याला चक्क आंब्याच्या झाडाला लटकवत गळफास दिला. सदर घटनेनंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पोलीस तालुका पोलीस ठाण्यात अक्षता हिचे वडील प्रकाश ज्ञानदेव बोरावके ( राहणार पडेगाव तालुका श्रीरामपूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बलराम दत्तात्रय कुदळे याच्याविरुद्ध खुनाचा तर दत्तात्रय गुलाब कुदळे सासरा, जीवन दत्तात्रय कुदळे भाया, सुजाता जीवन कुदळे जाव आणि सुरेखा दिनू रासवे नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


धक्कादायक बाब म्हणजे आरोपी बलराम कुदळे याने चाकण येथे राहत असलेल्या महेश प्रकाश बोरावके या मेहुण्याला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती दिली तसेच आपण आपली पत्नी आणि मुलाचा कशा पद्धतीने खून केला हे देखील दाखवले त्यानंतर मग त्यांचे फोटो काढून या नराधमाने ते सोशल मीडियावर देखील टाकले.


घटनेची माहिती समजताच शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी अंत्यविधी हा सासरच्या लोकांचा घरासमोर करण्याचा पवित्रा घेतला होता. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तसेच निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यानंतर त्यांचा राग काही प्रमाणात शांत झाला. सदर घटनेविषयी संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments