सोलापूर-सांगोला तालुक्यात तुफान वारा,अवकाळी पावसाने पिके,फळबाग घरांचे झाले मोठे नुकसान -संबंधित प्रशासनाने याविषयी सर्वांचे तक्रारी – पंचनामा घेण्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे आव्हान..
सांगोला तालुक्यात तुफान मागील दोन -चार दिवसांपासून सांगोला तालुका व परिसरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने तुफान पावसामुळे फळबाग व घरांचे मोठे नुकसान झाले आहे उन्हाळी पिके सुपडा साफ झाली आहेत मका गहू हरभरा डाळींब यासह आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बळीराजा या पावसाने मेटाकुटीला आला आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे काही भागात गारपिटीचा पाऊस झालेला आहे
अशातच महसूल आणि इतर विविध कर्मचारी संप कारणामुळे अद्याप वरील झालेले नुकसान आणि पंचनामा – अद्याप येथपर्यंत अधिकारी पोहचलेले नाहीत. अशा तक्रारी येत असून यामुळे याविषयी सम्बधित अधिकारी/प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आव्हान डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केलं आहे.
अचानक आलेल्या मागील दोन -चार दिवस अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यात अनेक भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या सर्व नुकसान ग्रस्तांचे पंचनामे तहसील कार्यालयाने सर्व तलाठी मार्फत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा-याबाबत जनतेच्या तालुक्यातुन विविध दुर्लक्षित तक्रारी-वेदना स्वतः
शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी चे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी पाहून त्यांनी तत्काळ याचा अहवाल तातडीने जिल्हाधिकार्यांकडे पाठवावा अशी तातडीची मागणी यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास पंचनामा -तक्रारी संदर्भात फोन करावा सहकार्य मदत केले जाईल असे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शेवटी सांगितले आहे.
0 Comments