बदली पाहिजे असेल तर ' रात्री बायकोला पाठव ' !
त्रासाला कंटाळून वायरमनने घेतले स्वत:ला जाळून !
बदली मागणाऱ्या वायरमनला ‘ बदली हवी असेल तर बायकोला एक रात्रीसाठी पाठवून दे ‘ असे सांगणाऱ्या वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून संबंधित वायरमनने अधिकाऱ्याच्या केबिनबाहेर स्वत:ला पेटवून घेतले. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे त्याचा मृ्त्यू झाला.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील उत्तर प्रदेश सरकारच्या वीजखात्याच्या कार्यालयात हा प्रकार घडला. गोकुळ प्रसाद हे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याचे वरिष्ठ अधिकारी ज्युनिअर इंजिनिअर नागेंद्र कुमार आणि एका क्लार्कला आता निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जळालेल्या अवस्थेतील एका व्हिडिओमध्ये गोकुळ प्रसाद आपण हे टोकाचे पाऊल का उचलले हे सांगताना दिसत आहे. आपले वरिष्ठांनी आपला छळ केला, पोलिसांची मदत मागितली पंरतू त्यांनी मदत केली नसल्याचे सांगताना दिसत आहे.
दुसऱ्या एका व्हिडिओत गोकुळ प्रसाद यांची पत्नी आपले म्हणणे मांडताना दिसते आहे. त्यामध्ये आपल्या पतीचा वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला छळ आणि केलेल्या अनैतिक मागण्यांची माहिती देताना देताना दिसते आहे आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ज्युनिअर इंजिनिअरवर गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यांच्यावर आत्महत्तेला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
0 Comments