बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ! बापानेच केला मुलीवर अत्याचार….!
नाशिक:जिल्ह्यातील चिचोंडी खुर्द येथे स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार सहन न झाल्याने मुलीने बापाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
मजूर बापाने आपल्या मुलीवर राहत्या घरात अत्याचार केला. फिर्यादी मुलगी तेरा वर्षांची असून तिचा बाप हा चाळीस वर्षांचा आहे. मुलीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती पाचवीत असल्यापासून ते आताचा गुढीपाडवा सण साजरा झाल्यानंतरच्या सोमवारपर्यंत वेळोवेळी बापाने घरात कुणीही नसतांना एकटी असल्याचा फायदा घेत,
जीवे ठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केला.या प्रकरणी पीडित मुलीने पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर तक्रार केल्यानंतर शहर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन कारवाई केली आहे.आरोपीवर पोस्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments