google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग : आमदार प्रणिती शिंदे तातडीने दिल्लीला रवाना ; हे आले कारण समोर

Breaking News

ब्रेकींग : आमदार प्रणिती शिंदे तातडीने दिल्लीला रवाना ; हे आले कारण समोर

 ब्रेकींग : आमदार प्रणिती शिंदे तातडीने दिल्लीला रवाना ; हे आले कारण समोर


सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टी निमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अशी दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याने सोलापुरात नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. 


बाळासाहेब थोरात सोलापुरात असल्याने त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळाली. सोलापुरातून वाहनाने त्या पुणे येथे जाऊन पुण्यातून थेट विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत. 


सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रणिती शिंदे यांनी सकाळी लवकर अक्कलकोटला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर त्या शासकीय विश्रामगृहावर येऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वागत केले, काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्या, कार्यक्रम संपल्यावर त्या दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असता दिल्ली येथे राहुल गांधी यांनी देशातील मागासवर्गीयांच्या प्रश्नांबाबत प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली 


असून त्या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे उपस्थित राहणार असल्याचे समजले आहे. मात्र राज्यांमध्ये मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे त्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते त्यामुळेच तर राहुल गांधी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिल्लीला बोलावले नसेल ना असाही तर्क वितर्क काढले जात आहेत.

Post a Comment

0 Comments