google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शुट एट साईटचे आदेश?

Breaking News

किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शुट एट साईटचे आदेश?

 किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शुट एट साईटचे आदेश?

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी दोनदा हल्ला केला. या दोन्ही वेळेस ते बालंबाल बचावले. दरम्यान दुसऱ्या हल्ल्यात अर्थात दोन दिवसापूर्वी ते राणा दाम्पत्यास भेटावयास गेले होते तेव्हा त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात त्यांना जखम देखील झाली.


दरम्यान आता या अशा दोन वेळा झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत सीआयएसएफच्या हेडक्वार्टरने याची गंभीर दखल घेतली असल्याचे वृत्त आहे. सुत्रांच्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाला तर शुट एट साईटचे आदेश देण्यात येणार आहेत असे वृत्त साम टीव्हीने दिले आहेत. झेड सुरक्षा दिलेल्या व्यक्तीच्या ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने मुंबई पोलिसांकडे याबाबत जाब विचारला गेला. मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी सीआयएसएफचे कमांडर यांनी बातचीत केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


घडलेल्या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्या जवानांना प्रत्येक कार्यक्रमात अतीदक्ष राहून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान सोमय्या यांच्यावर दोनदा हल्ले झाले आहेत. हे हल्ले शिवसैनिकांनीच केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. झेड सुरक्षा दिलेल्या व्यक्तीच्या ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने ही गंभीर बाब आहे.


या हल्ल्याप्रकरणी सर्व माहिती स्वतः किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून दिली होती. यावर बोलताना सोमय्या म्हणाले, की आम्ही भेटून सर्व माहिती दिली. सात जणांवर केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर आहे. २० ते २५ मिनीटे चर्चा झाली. कालच्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली.एक स्पेशल टीम मुंबईला पाठवून चौकशी करण्याची मागणी आम्ही गृहमंत्र्यांना केली, असंही सोमय्या म्हणाले.

Post a Comment

0 Comments