पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचे व परिसराचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण-
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांच्या मागणीला यश.
सांगोला (प्रतिनिधी)- सांगोला शहरातील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचे व परिसराचे सुशोभीकरण काम करावे याबाबतचे निवेदन सांगोला नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी निवेदन दिले होते
या निवेदनाची दखल घेऊन मुख्य अधिकारी कैलास केंद्रे यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात केले यामध्ये पुतळ्याचे रंगकाम, परिसराचे कंपाउंड चे रंगकाम यासह आधुनिक रंगीत लाईट्स, विविध प्रकारच्या लाईट्स, त्याचबरोबर पाण्याचे रंगीत कारंजे इत्यादी सुशोभीकरणाचे काम पूर्ण केलेले आहे. सदरचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण केल्यामुळे शहरातील नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे. लहान मुलासह इतर ही नागरिक हे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
"गेली अनेक दिवसापासून पाण्याचे कारंजे बंद होते परंतु आता पुतळ्याची रंगरंगोटी व परिसराची रंगरंगोटी यासह इतर कामे केल्यामुळे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे जाहीर आभार मानतो असे मत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले आहे"
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचे व कंपाउंड चे सुशोभीकरण केल्यामुळे याठिकाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे त्यामुळे खूप दिवस दुर्लक्षित असलेल्या पुतळ्याचे सुशोभिकरण झाल्यामुळे काँग्रेस प्रेमी व सामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.


0 Comments