google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 घरात घुसून मारू ! खवळली बारामती !

Breaking News

घरात घुसून मारू ! खवळली बारामती !

 घरात घुसून मारू ! खवळली बारामती !

बारामती : आमच्या दैवतावर कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना घरात घुसून मारू, दोन पायावर याल पण जाताना तशी स्थिती नसेल असा सणसणीत इशाराच आज बारामतीच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिला आहे. 


राष्ट्रवादीचे प्रमुख आणि देशाचे  नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत. राजकारण तर पुरते ढवळून गेले आहे. राज्यभरात केवळ राष्ट्रवादी पक्षच नव्हे तर सर्वसामान्य माणूस देखील संताप व्यक्त करीत आहे. सिल्व्हर ओक वर झालेल्या हल्ल्याचा निषेध गावोगावी होताना दिसत आहे. 


बारामती येथे तर संतापाची आग पाहायला मिळू लागली असून आज राष्ट्रवादीने आपला इरादाच स्पष्ट केला आहे.  वडीलधाऱ्याची शिकवण आणि संस्कार यामुळे अजून आम्ही संयम बाळगत आलो आहोत पण आमच्या दैवतावरच हल्ला करण्याचा प्रयत्न कुणी करायला लागला तर त्यांना त्यांच्या घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच देण्यात आला आहे. 


बारामती येथे आज सिल्व्हर ओकवरील घटनेबाबत निषेध सभा झाली यावेळी प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी आपल्या संतप्त भावनांना वाट करून दिली.  १२ एप्रिल रोजी बारामतीत येऊन गोविंदबाग येथे आंदोलन करण्याची भाषा केली आहे. या दिवशी प्रत्येक कार्यकर्ता गोविंदबागेत थांबलेला असेल आणि जशास तसे उत्तर दिले जाईल. बाहेरच्या व्यक्तीने येऊन येथे काही करण्याचा प्रयत्न केला तर जेष्ठांनी देखील आता आम्हाला रोखू नये, त्यांनी घरात बसावे, प्रत्युत्तर आम्ही देतो. आता केवळ निषेधाच्या सभा घेऊन उपयोग नाही अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. 


पायावर याल पण --

नेत्यांच्या आदेशावर आजवर शांततेच्या मार्गाने आम्ही निषेध व्यक्त केला पण बारामतीत येवून कुणी इथल्या शांततेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. येताना आपल्या पायावर याल पण जाताना मात्र तशी अवस्था असणार नाही असा रोखठोक इशारा या निषेध सभेत देण्यात आला.

Post a Comment

0 Comments