google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग : 32 हजाराची लाच मागून 15 हजार घेणारा सहायक विद्युत निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Breaking News

ब्रेकींग : 32 हजाराची लाच मागून 15 हजार घेणारा सहायक विद्युत निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 ब्रेकींग : 32 हजाराची लाच मागून 15 हजार घेणारा सहायक विद्युत निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सोलापूर - 32 हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 15 हजार रुपये स्वीकारत असताना सहायक विद्युत निरीक्षक फैजुलअल्ली महेबुब मुल्ला यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच रंगेहात पकडले.


यातील तक्रारदार यांना कंत्राट पध्दतीने इलेक्ट्रीकलची कामे घेण्याकरीता नवीन फर्म सुरु केली असुन त्यासाठी आवश्यक असणारे विद्युत पर्यवेक्षक परवाना तसेच विद्युत ठेकेदार परवाना मिळण्याकरीता विद्युत निरीक्षक विभाग, सोलापुर येथे अर्ज केला असता त्यांना विद्युत पर्यवेक्षक परवाना मिळाला आहे. 


विद्युत ठेकेदार परवाना मिळण्याकरीता पाठपुरावा करीत असता यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे यापुर्वी दिलेल्या विद्युत पर्यवेक्षक परवान्याचे बक्षीस म्हणुन 10 हजार रुपये व सध्याचे ठेकेदार परवान्याचे 22 हजार रुपये असे मिळून 32 हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 15 हजार रुपये स्विकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले, याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments