google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामीण भागातील रस्ते व विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर -आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

ग्रामीण भागातील रस्ते व विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर -आमदार शहाजीबापू पाटील

 ग्रामीण भागातील रस्ते व विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर -आमदार शहाजीबापू पाटील

 सांगोला /प्रतिनिधी.महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातुन सांगोला विधानसभा मतदार संघासाठी गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे साठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून लेखाशिर्ष २५१५ अंतर्गत ५कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.


सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील गावांतर्गत रस्ते रस्तावरील शिडीवर्कची कामे, सभामंडप कामे, स्मशानभूमी दुरुस्ती अशी विविध प्रकारची कामे यामधून होणार असल्याने ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होणार आहे व ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे होणार आहे


 या सर्व कामांचे अंदाजपत्रके तयार करण्याचे काम चालू असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करण्यात येतील असे यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments