काय सांगता ?गुणरत्न सदावर्तेंनी घरात पाळलाय चक्क गाढव, नाव ठेवलंय 'मॅक्स'; गाढवामुळे चर्चांना उधाण
एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अॅड गुणरत्न सदावर्ते बरेच चर्चेत आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यामुळे मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली.
पण या अटकेनंतर एका वेगळ्याच कारणामुळे अॅड गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. ही चर्चा आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरत आहे. ही चर्चा म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांनी घरात चक्क गाढव पाळलं आहे. या गाढवासोबतचे गुणरत्न सदावर्ते आणि कुटुंबियांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सदावर्ते पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांचा पाळीव गाढव असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या गाढवाचं नाव मॅक्स असे आहे. गुणरत्न यांची लेक झेनचा या मॅक्स गाढवासोबतचा फोटो व्हायरल होत आहे.तसेच सदावर्तेंची पत्नी जयश्री पाटील आणि मुलगी झेनचे गाढवासोबत फोटो देखील तुफान व्हायरल होतायत.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाहबाबत हायकोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर या गाढवाला म्हणजे मॅक्सला पेढे भरवण्यात आल्याचे समोर आलेय. तसेच त्याचे देखील व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात या मॅक्सला सहभागी केले जाते. जयश्री सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटवर या मॅक्स गाढवाचे फोटो शेअर केले आहेत. मात्र हा गाढवं नेमका कोणत्या घरात पाळला आहे ते अद्याप समोर आलेले नाही.
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आज कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे 1 मेपर्यंत सदावर्तेंना कोठडीतच राहवे लागणार आहे. दरम्यान बीड, सातारासह अनेक ठिकाणी सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments