अरे व्वा...!सोलापूर जिल्ह्यातील रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबर ! एकाच क्लिक मध्ये मिळाली तब्बल इतक्या घरांना मंजुरी
सोलापूर – जिल्हयात ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणेच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समता पंधरवाडा निमित्त महाआवास अभियान अंतर्गत 2641 रमाई आवास घरकुलांना एकाचवेळी प्रशासकीय मंजुरी सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथमच असा पायंडा पाडला आहे. जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांनी आॅनलाईन व्हीसीचे आयोजन केले होते. या बैठकीत सिईओ दिलीप स्वामी यांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या 2641 घरकुलांना केंद्र शासनाचे संकेतस्थळावर प्रशासकीय मान्यता दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, दक्षिण सोलापूर व मोहोळ चे गटविकास अधिकारी गणेश मोरे, उत्तर सोलापूरच्या गटविकास अधिकारी जस्मीन शेख, गटविकास अधिकारी एस बी खाडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी एच कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.
घरकुलांच्या कामांना गती देणे साठी सोलापूर जिल्हा परिषदेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पंधरवाडा निमित्त महाआवास अभियान अंतर्गत रमाई घरकुलांना एकाचवेळी प्रशासकीय मान्यता दिले मुळे गरीबांना वेळेत घरे मिळणेचा मार्ग सुकर झाला. मानवतेच्या भावनेतून सोलापूर जिल्हा परिषदेने उचलेले सकारात्मक पाऊल गरीबांना छत मिळणेस मदत झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने मोहिम स्वरूपात आॅनलाईन रजिस्ट्रेशन करून घेणेत आले. यामुळे गटविकास अधिकारी यांची जबाबदारी वाढली आहे.
समता पंधरवाडा निमित्त रमाई घरकुल व शबरी घरकुलांना मंजुरी देऊन जिल्ह्सात चांगला पायंडा पाडला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष धोत्रे व त्यांचे टीम ने सर्व कागदपत्रांची छाननी वेळेत करून प्रशासकीय मान्यता देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले बद्दल अभिनंदन केले.रमाई आवास अंतर्गत 2641 व शबरी आवास मधील 44 घरकुलांना प्रशासकीय मान्यता देणेत आली आहे.
घरकुलाला नाविण्यतेची जोड द्या – सिईओ दिलीप स्वामी
मोहिम स्वरूपात कामे पुर्ण करा – अतिरिक्त मुकाअ संतोष धोत्रे


0 Comments