google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जज साहेब, माझी पत्नी महिला नाही, पुरुष आहे… हा दावा करीत सर्वोच्च न्यायालयात फसवणूकीचा आरोप !

Breaking News

जज साहेब, माझी पत्नी महिला नाही, पुरुष आहे… हा दावा करीत सर्वोच्च न्यायालयात फसवणूकीचा आरोप !

 जज साहेब, माझी पत्नी महिला नाही, पुरुष आहे… हा दावा करीत सर्वोच्च न्यायालयात फसवणूकीचा आरोप !

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात एक आश्चर्यकारक प्रकरण पोहोचले आहे. एका व्यक्तीने खळबळजनक आरोप केला आहे. त्या व्यक्तीने ज्या महिलेशी लग्न केले, ती त्याची पत्नी महिला नसून चक्क पुरुष आहे. हा दावा करीत या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. माझी पत्नी ही महिला नसून पुरुष आहे. त्यामुळे माझी फसवणूक झाली आहे. जज साहेब, मला या प्रकरणात न्याय मिळावा, अशी विनवणी याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्याच्या याचिकेवर विचार करण्याचे मान्य केले.


एका इन्टरनेट वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्ट पहिल्यांदा मे 2019 मध्ये समोर आली होती. याचिकाकर्त्या व्यक्तीच्या तक्रारीची ग्वाल्हेरच्या दंडाधिकाऱ्यांनी दखल घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने कथित पत्नीविरुद्ध फसवणूक केल्याच्या आरोपाची दखल घेतली होती. पीडितेने 2016 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर त्वरित त्याला समजले की त्याची पत्नी ही महिला नसून पुरुष आहे. पत्नीला पुरुषाचे गुप्तांग आहे व ती लग्नासाठी पूर्णपणे असक्षम आहे. त्यामुळे दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण होऊ शकत नाहीत. या सर्व प्रकारानंतर  याचिकाकर्त्याने ऑगस्ट 2017 मध्ये कथित पत्नी व तिच्या वडिलांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी दंडाधिकार्‍यांकडे धाव घेतली होती.


यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करण्यास नकार  दर्शवला होता, मात्र  न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने कथित पत्नीकडून उत्तर मागितले होते.परंतु , याचिकाकर्त्याने पत्नीचा वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर केला. या अहवालात पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय असल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. अविकसित हायमेन हा जन्मजात विकार आहे. त्यामुळे योनीमार्गात अडथळा निर्माण होतो, असे म्हणणे त्याने न्यायालयासमोर मांडले. याचिकाकर्त्याच्या बाजूने ज्येष्ठ वकील एन. के. मोदी यांनी युक्तिवाद केला. याचिकाकर्त्याची पत्नी पुरुष असल्याचे दिसून आले आहे. हा भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अन्वये फौजदारी गुन्हा आहे, असाही युक्तिवाद त्यांनी खंडपीठापुढे केला आहे.


तसेच  पतीने आपली पत्नी महिला नसून पुरुष असल्याचा दावा केला असताना कथित पत्नीनेही पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात तिने ही तक्रार केली आहे. त्यात तिने पतीने आपल्याला क्रूर वागणूक दिल्याचे म्हटले होते. आता या अनोख्या खटल्यात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतेय, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments