महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वानी स्वावलंबी बनावे--सौ रेखाताई पाटील
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला अर्बन बँकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न.
सांगोला (संतोष साठे) राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी स्वराज्य काळात राबविलेला स्त्री सबलीकरनाचा आदर्श आज देशाला आदर्शवत असून त्यांच्या विचाराने प्रेरित होवून सांगोला येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला अर्बन बँकेच्या वतीने खास महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धा नक्कीच स्त्रीयांना स्वावलंबी बनविण्यासाठी उत्तम व्यासपीठ बनवतील,यात शंका नाही,माँसाहेब जिजाऊ महिला अर्बन बँके खास महिलाना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी गेली तीन वर्षे प्रयत्न करीत असून त्यांना मी शुभेच्छा देते,असे मत सौ रेखाताई शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन बँकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिलासाठी विविध स्पर्धेच्या उदघाटन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या .
यावेळी व्यासपीठावर सुरेखा काकी माणिक भोसले, प्रमुख पाहुण्या मधुमती साळुंखे-पाटील, सुवर्णा इंगवले, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला अर्बन बँकेच्या चेअरमन सौ शोभाताई देशमुख, व्हाईस चेअरमन सौ संगीता टकले, मेरीगोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अध्यक्षा कल्पना गोडसे,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुनीता राऊत, माजी नगरसेविका शुभांगी माने, आरती देशमुख मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे मधुमती साळुंखे-पाटील यांनी आज धकाधकीच्या जीवनात महिलांसाठी जिजाऊ महिला अर्बन बँकेने विविध स्पर्धांचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असून नक्कीच या निमित्ताने महिलांना एक वेगळे व्यासपीठ मिळालेआहे. राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन बँकेच्या सर्व संचालक मंडळाचे या निमित्तानं मी अभिनंदन करून शुभेच्छा देते आणि महिलांनी सुद्धा या उपक्रमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी सुवर्णा ताई इंगवले यांनी सुद्धा आपल्या मनोगतात जागतिक महिला दिन का साजरा केला जातो आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी समाजामध्ये वावरत असताना कशा पद्धतीने राहिले पाहिजे,सामाजिकतेची जाण ठेवून महिलांनी समाज विधायक कार्य केले
पाहिजे असा सल्ला देऊन सर्व विजेत्या स्पर्धकांना आणि स्पर्धा संयोजकांचे अभिनंदन केले. सदर स्पर्धेत जवळपास शंभर स्त्रियांनी सहभाग नोंदवला. या सर्व महिलांचे स्वागत आरती बाळराजे देशमुख यांनी गुलाबपुष्प देवून केले.विविध स्पर्धेतील यशस्वी महिला स्पर्धकांना रोख बक्षिसे आणि सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.सदर स्पर्धेचे सुत्रसंचलन पल्लवी थोरात आणि गीतांजली मोहिते यांनी केले
तर आभार जिजाऊ महिला अर्बन बँकेच्या चेअरमन शोभाताई देशमुख यांनी केले.सदर स्पर्धा मेरीगोल्ड इंग्लिश मीडियम स्कुल च्या मैदानावर पार पडल्या.सदर स्पर्धा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी प्रा संजय देशमुख, राहुल टकले, प्रवीण मोहिते,बाळराजे देशमुख आणि जिजाऊ महिला अर्बन बँकेच्या संचालक मंडळानी प्रयत्न केले.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या यशस्वी महिला स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे--
$$वेशभूषा स्पर्धा;--
प्रथम क्रमांक - दिपाली कोळसे पाटील
द्वितीय क्रमांक--लक्ष्मी स्वामी
तृतीय क्रमांक- वनिता झिंजुर्डे
उत्तेजनार्थ- मनीषा मोरे
$$ वैयक्तिक नृत्य स्पर्धा )-;
प्रथम क्रमांक- सिमरन सोनवणे
द्वितीय क्रमांक -दिपाली अमर टकले
तृतीय क्रमांक -ऋतिका भजनावळे
उत्तेजनार्थ क्रमांक-वनिता झिंजुर्डे
$$-जोडी नृत्य स्पर्धा-;
प्रथम क्रमांक- सीमा गवळी, प्रज्ञा चौगुले
द्वितीय क्रमांक -अश्विनी सरगर,निकिता पाटील तृतीय क्रमांक-वैभवी भडंगे, माधवी पवार उत्तेजनार्थ क्रमांक- सुरेखा पवार अश्विनी कांबळे
$$ फळभाज्या कलाकृती;-
प्रथम क्रमांक- सीमा गवळी
द्वितीय क्रमांक- वैभवी भडंगे
तृतीय क्रमांक- निकिता पाटील
उत्तेजनार्थ-- ज्योती महांकाळ
$$ उखाणे स्पर्धा-;
प्रथम क्रमांक- दीपाली टकले
द्वितीय क्रमांक- उज्वला कोठावळे
तृतीय क्रमांक- मनिषा मोरे
$$लिंबू चमचा स्पर्धा-;
प्रथम क्रमांक- पूनम माळी
द्वितीय क्रमांक- अश्विनी विटेकर
तृतीय क्रमांक- पुनम सावंत
$$ संगीत खुर्ची स्पर्धा;-
प्रथम क्रमांक- मनिषा मोरे
द्वितीय क्रमांक -राणी गाडे
तृतीय क्रमांक- विनिता झिंजुर्डे

0 Comments