Breaking News

नोकरी करणार्‍या महिलांनी आई होण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा “यांनी” दिला सल्ला!

 नोकरी करणार्‍या महिलांनी आई होण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा “यांनी” दिला सल्ला!

मुलींना घरातील मुलांप्रमाणेच वाढवायला हवे, असे मत माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी शनिवारी व्यक्त केले. असे केल्यास त्यांच्यामध्ये भविष्यातील नेते घडवण्यात यश येऊ शकते असेही त्या म्हणाल्या आहेत.


“तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याशिवाय किंवा कोणी गृहिणी म्हणून निवडल्याशिवाय तुम्ही लग्न करू नये,” तसेच “नोकरी करणाऱ्या महिलांनी आई केव्हा व्हायचे, याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. कारण इतर कोणीही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही,”असा सल्ला त्यांनी महिलाशी बोलताना दिला.


आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी ‘वुमन पॉवर, ए ग्लोबल मूव्हमेंट’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना, समाजाने विशेषतः पालकांनी आणि शाळांनी मुलींना नेतृत्वगुण शिकवणाऱ्या खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुलींना शिक्षण घेताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, याबद्दल आपले अनुभव सांगितले.

Post a Comment

0 Comments