धक्कादायक! मुलांना पोहण्यास शिकवणाऱ्या आईचा पाण्यात बुडून
मृत्यू; सांगोलातालुक्यातील'या' गावातील घटना
मुलांना विहिरीत पोहण्यास शिकवत असताना आईचा तोल जाऊन पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांगोला तालुक्यातील हातीद येथे घडली आहे. विद्या रमेश पवार (वय २८ रा.हातीद ता . सांगोला) असे पाण्यातबुडून मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
हातीद ता सांगोला येथील विद्या रमेश पवार यांचे पती रमेश हे मुंबईत रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. तर विद्या या सासू , सासरे आणि स्वराज , स्वरुप या दोन मुलांसह हातीद येथे राहण्यास आहेत. दि.६ मार्च रोजी रोजी सकाळी दहाच्या सुमारास विद्या या शेतात ज्वारीची मोडणी करण्यासाठी दोन्ही सोबत मुलांना घेवून गेली होती. शेजारील अमोल पवार यांचे विहीरीवर स्वरुप व स्वराज यांना पोहण्यास शिकवित असताना विद्या यांचा पाण्यात अचानक तोल जावून त्या विहीरीत पडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सदरची घटना सासरे गोरख पवार यांनी नोकरनिमित्त सांगोला शहरात राहत असलेली सून सुप्रिया धनाजी पवार यांना फोन करून सांगितली. दरम्यान विद्या पवार यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी मोटारीच्या साहाय्याने विहिरीतील पाणी काढून विद्या यांचा मृतदेह बाहेर काढला. सांगोला ग्रामीण रुग्णालयात विद्या पवार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.याबाबत सुप्रिया धनाजी पवार यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

0 Comments