google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रविवारी सांगोल्याच्या आठवडा बाजारसाठी येणाऱ्या वाहन चालकांची पोलिसांकडून मोठी आर्थिक लुटू ; पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी

Breaking News

रविवारी सांगोल्याच्या आठवडा बाजारसाठी येणाऱ्या वाहन चालकांची पोलिसांकडून मोठी आर्थिक लुटू ; पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी

 रविवारी सांगोल्याच्या आठवडा बाजारसाठी येणाऱ्या वाहन चालकांची पोलिसांकडून मोठी आर्थिक लुटू ;

पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी 

सांगोला प्रतिनिधी ; पोलिस रस्त्या रस्त्यावर गाड्या आडवत असल्याचे प्रकार आपण नेहमीच बघत असतो. गाडी अडवल्यानंतर कागदपत्रांची मागणी संबंधित पोलीस करतो आणि कागदपत्रातील त्रुटी शोधायला सुरुवात करतो. आणि या ना त्या कारणाने पोलीस कर्मचारी वाहन चालकास दंड भरण्यासाठी सांगतो.


परंतु सांगोला येथे रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात आपली जनावरे (शेळ्या, मेंढ्या, जर्सी, मशी,बैल,गायी,ईत्यादी ) विक्री करण्यासाठी मिळेल त्या वाहनाने सांगोला तालुक्यासह जत , चडचण, सांगली,सोलापूर, पंढरपूर, अकलूज, मंगळवेढा , बेळगावसह महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील शेकडो नागरिक व व्यापारी जनावरे खरेदी विक्री साठी येतात. तसेच बाजारसाठी अन्य प्रकारची वाहने येतात.


या वाहन चालकांकडून जिल्हा ट्राफिक पोलीस व स्थानिक ट्राफिक पोलीस सांगोला शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावर थांबून सकाळी ६ वा.पासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत राजरोसपणे इंट्री (हप्ता) गोळा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या ट्राफिक पोलिसांना कोणत्यातरी वरिष्ठ अधिकारी यांचे अभय असल्याशिवाय हे ट्राफिक पोलीस अश्या प्रकारे राजरोसपणे इंट्री (हप्ता) गोळा करण्याचे काम करणार नाहीत अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमधून होत आहे. 


कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या रोगामुळे गेल्या दोन वर्षीपासून आर्थिक डबघाईला आलेल्या शेतकरी वर्गाला आता कुठे आपले पशुधन विक्री करून चार पैसे गोळा करण्यासाठी मोकळीक मिळाली असताना पोलिसांच्या या हप्ते खोरीमुळे आर्थिक बोजा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने लक्ष घालून सांगोला तालुक्यात जिल्हा व स्थानिक ट्राफिक पोलिसांकडून सुरू असलेली इंट्री (हप्ता) बंद करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments