Breaking News

…मग घरी बोलावून बलात्कार केला!

 …मग घरी बोलावून बलात्कार केला!

 शेअर ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री करत आधी महिलेचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  हळूहळू महिलेचा विश्वास विश्वास मिळवूनआपण अविवाहित असल्याचे सांगून तिला लग्नासाठी विचारले. त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडिता त्याने सांगितलेल्या पत्त्यावर त्याला भेटायला गेली. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत दुष्कर्म केले. याप्रकरणी पीडितेने केशवपुरम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडितेला खोलीत डांबून तिच्यावर बलात्कार केला.


पीडित महिला डॉक्टर आहे. पीडिता आरोपीला केशवपुरम परिसरात भेटायला गेल्यानंतर आरोपीने तिला खोलीत डांबून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने जीव वाचवून तेथून पळ काढला आणि पोलिस ठाणे गाठले. महिलेने पोलिसांना सर्व झालेल्या गोष्टी सांगितल्या. 


त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. महिलेने गुन्हा नोंदवताना म्हटले आहे की, भेटीनंतर आरोपीने तिला एका खोलीत कोंडून जबरदस्तीने बलात्कार केला. पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये बलात्कार तसेच बळजबरी आणि अंतर्गत जखमांचे पुरावे आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments