सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील शेतकऱ्यांच्या घरासमोरील गोठ्यातून रात्रीत 3 शेळ्यांसह बोकडाची चोरी
झाली आहे. 22 हजार रुपये किमतीचे जनावरे चोरीप्रकरणी धनाजी अंगद बाबर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिवारी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मानेगाव येथील शेतकरी धनाजी बाबर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन केले आहे. त्यांच्याकडे 10 शेळ्या मेंढ्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांनी शेळ्या-मेंढ्या गोठ्यात ठेवल्या. शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर उठून गोठ्याजवळ पाहिले असता 3 शेळ्या आणि बोकड दिसले नाही. त्यांनी जनावरांचा आजूबाजूला शोध घेतला. चौकशी केली.
मात्र जनावरे काही सापडले नाहीत. चोरीला गेलेल्या 3 शेळ्यांपैकी 2 तांबड्या तर 1 पांढऱ्या रंगाची अंदाजे 13 ते 14 महिन्याची होती. बोकड काळ्या रंगाचे 7 महिन्याचे होते. याबाबत बाबर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस जनावरे चोरट्याचा शोध घेत आहेत.

0 Comments