दोन महिन्यापासून मागणी करुन हातपंप (हापसा) केला दुरुस्त कोसारी ग्रामपंचायतीचे विशेष आभार ...
         

वाहिद आतार  :- मागील दोन महिने पासून मागणी करुन दि. 03/03/2022 हातपंप (हापसा) केला दुरुस्त .

    कोसारी गावातुन कोसारी सिंग्नहळ्ळी ,वाळेखिंडी रोडवर गुरव मळा येथील रस्त्यालगत असलेल्या  बोअर वेल, हातपंप, (हापसा)लोकांची पाण्यासाठी वणवण भटकती होऊ नये या उद्देशाने कोसारी ग्रामपंचायतीकडुन अगदी उत्तम चांगली सोय करण्यात आली होती, पण गेल्या दोन महिन्यांपासून हातपंप निकामी झाल्याने ऐन उन्हाळ्याची चाहूल लागली असताना पिण्याच्या पाण्यासाठी शेतातील विहीरीवर  स्वताचा जीव धोक्यात घालून पाण्याची तहान पुर्ण करण्यासाठी खासकरुन महिलांना वन-वन भटकंती करावी लागत होती.

   पण ऐनवेळी कोसारी ग्रामपंचायतीने हापसा दुरुस्ती  केल्यामुळे पाण्यासाठी असलेली भटकंती थांबली आहे, त्यामुळे मा किसन टेंगले, मा रावसाहेब राजाराम हेगडे, संभाजी टेंगले 

सागर टेंगले ,तानाजी टेंगले या सर्वांच्या वतीने कोसारी 

 ग्रामपंचायतीचे मनपुर्वक आभार .