Breaking News

पालकमंत्री भरणेमामांच्या सूचना कार्यक्रमाला आमदार प्रणितीताईंना बोलवा, मामा होणार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक

 पालकमंत्री भरणेमामांच्या सूचना कार्यक्रमाला आमदार प्रणितीताईंना बोलवा, मामा होणार 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक 

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे यंदा शुक्रवार सोडून रविवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत या दौर्‍यात ते सर्व खाजगी कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. विशेष म्हणजे रविवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील विविध चार कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती राहणार आहे.


त्यामुळे एक प्रकारे पालकमंत्री भरणे मामा रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यापूर्वी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री भरणे यांना सांगून रद्द केलेला कार्यक्रम तो रविवारी होणार आहे, प्रभाग क्रमांक 14 मधील जिंदाशा मदार चौक ते पद्मशाली चौक या दरम्यानच्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे,


हा प्रभाग एमआयएम नगरसेवक रियाज खरादी यांचा आहे परंतु पालकमंत्र्यांनी यापूर्वीच शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यासह इतर स्थानिक नेत्यांना निमंत्रण देण्याच्या सूचना तोफिक शेख आणि रियाज खरादी यांना केल्याची माहिती आहे. सकाळी 11 वाजता पार्क चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व नॉर्थकोट मैदान सुशोभीकरण कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे,


त्यानंतर प्रभाग पाच मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थी विहार प्रेरणा भुमी सुशोभीकरण कार्यक्रम, प्रभाग चार मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उद्घाटन कार्यक्रम यानंतर प्रभाग क्र. १ न्यु बुधवार पेठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उद्यान येथे नियोजित माता रमाई आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरण कार्यक्रमास उपस्थिती असे कार्यक्रम होणार आहेत.

Post a Comment

0 Comments