Breaking News

१७ वर्षांच्या मुलानेच केली आई - बापांची हत्या , त्यानंतर घरातच मृतदेह पुरले , पाच दिवसांनंतर म्हणाला माझ्यावर प्रेम करत नव्हते

 १७ वर्षांच्या मुलानेच केली आई - बापांची हत्या , त्यानंतर घरातच मृतदेह पुरले ,

पाच दिवसांनंतर म्हणाला माझ्यावर प्रेम करत नव्हते

एका १७ वर्षांच्या मुलाने आपल्या आई-वडिलांना मारुन त्यांना घरातच पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाचा मोठा भाऊ घरी आला, तेव्हा पाच दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला.अंबिकापूर : एका १७ वर्षांच्या मुलाने आपल्या आई-वडिलांना मारुन त्यांना घरातच पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाचा मोठा भाऊ घरी आला, तेव्हा पाच दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला. आरोपीचा मोठा भाऊ घरी पोहचला तेव्हा आई-वडील घरात नव्हते आणि घरात दुर्गंधी येत होती. याने घाबरलेल्या आरोपीच्या मोठ्या भावाने पोलिसांना फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहचले.


चौकशीसाठी पोलिसांनी आरोपी १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर, त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यांना मारुन टाकून घरातच त्यांचे मृतदेह पुरल्याचेही त्याने स्वीकारले आहे. पोलिसांनी त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. छत्तीसगड राज्यात सरगुजामध्ये हा प्रकार घडला आहे.


घरात दुर्गंधी पाहून मोठ्या भावाने पोलिसांना कळवले

सरगुजा जिल्ह्यात खोधला गावात जयराम सिंह आणि फुलसुंदरी बाई हे राहत होते. त्यांची दोन मुले आहेत. मोठा मुलहा हेमंत हा आपल्या पत्नीसोबत सासुरवाडीलाच राहत होता. तो गुरुवारी आईवडिलांना भेटण्यासाठी गावी पोहचला. घरी आल्यावर त्याला -वडील दिसेनात. त्याने आजूबाजुला विचारणा केली मात्र कोणालाच ते कुठे गेलेत याची कल्पना नव्हती. त्याचवेळी घरातून दुर्गंधी येत असल्याचेही त्याच्या लक्षात आले. त्यानंतर हेमंतने पोलिसांना कळवले.


घरात खड्डा खणून दोन्ही मृतदेह पुरले

रात्री उशिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हेमंतच्या धाकट्या भावाची चौकशी केली असता घडलेला प्रकार समोर आला. १७ वर्षांच्या आरोपीने आई-वडिलांची हत्या केली, त्यानंतर घरातच खड्डा खणून त्याने दोघांचचे मृतदेह तिथे पुरल्याची धक्कादायक माहिती त्याने दिली आहे. पहिल्यांदा त्याने पित्याचा मृतदेह पुरला त्यानंतर त्याने आईचा मृतदेह पुन दिवसांनी पुरल्याचे सांगितले. विशेष म्हणजे एवढे झाल्यावरही तो त्याच घरात राहत, जेवण खाण करीत होता. हे ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांनी त्यानंतर मृतदेह काढून पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत.


हा आरोपी १२ वी नापास आहे आणि संतापी आहे. त्याला नेहमी आपले आई वडील हे आपल्यापेक्षा मोठ्या भावाला अधिक महत्त्व देतात असे वाटत होते. मोठ्या भावाचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. तो मजुरीचे काम करीत होता आणि सासुरवाडीलाच मुक्कामी होता. कधी कधी आई-वडिलांच्या भेटीसाठी तो गावी येत असे. आरोपी बेरोजगार असल्याने, आई-वडील त्याला ओरडत असत. या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या मनात दोघांबद्दल टोकाचा तिरस्कार निर्माण झाला होता. या आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचीही पोलिसांना शंका आहे. या प्रकरणी गावकऱ्यांचीही साक्ष नोंदवण्यात येते आहे.


लाकूड कापण्याच्या कुऱ्हाडीने मारले

आरोपी किशोरने पोलिसांना सांगितले की, पाच दिवसांपपूर्वी घरातील कुर्हाडीने त्याने ई वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्याने पहिल्यांदा वडिलांचा मृतदेह पुरला. त्यानंतर दोन दिवसांनी आईचा मृतदेह पुरला. हे सर्व केल्यानंतरही तो काहीच न घडल्यासारखा त्याच घरात राहत होता आणि स्वयंपाक करुन जेवतही होता.

Post a Comment

0 Comments