google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “गड्यानु दीपकआबा, बाबासाहेब नायतर श्रीकांतदादाही आमदार होतील”

Breaking News

“गड्यानु दीपकआबा, बाबासाहेब नायतर श्रीकांतदादाही आमदार होतील”

 “गड्यानु दीपकआबा, बाबासाहेब नायतर श्रीकांतदादाही आमदार होतील” 

आमचे काही खरे नाही. त्यामुळे प्रेमाने राहूया असे म्हणत बापूंनी अनेक चिमटेही घेतले. निवडणुकीवेळी निवडणुका झाल्या. तालुका समृध्द व्हायचाच असेल तर सर्वांना मिळून काम केले पाहिजे, असे म्हणत शहाजीबापू यांनी विरोधकांनाही आपल्या कवेत घेत सहकार्याचे आवाहन केले.


सांगोला तालुक्यातील जनतेनं संधी दिली म्हणून, मी आमदार झालो. माझे काम प्रामाणिक चालू आहे. उद्या मी आमदार असेल किंवा नसेल. कदाचित डॉ.बाबासाहेब देशमुख, दीपकआबा नाहीतर श्रीकांतदादाही आमदार होतील. आम्ही सगळी मंडळी एकच आहोत, तुम्हीही एकोप्याने राहून गावांचा विकास अशी मिश्किल साद आम.शहाजीबापू यांनी आमसभेत घातली. 


सांगोल्याचे लोकप्रिय आमदार ॲड.शहाजीबापू पाटील हे आपल्या मिश्किल बोलल्याने नेहमीच चर्चेत असतात. पण त्यांच्या पोटात काहीच राहत नाही. नेहमी सत्य आणि वास्तव सांगत असतात. अशातच शहाजीबापू पाटील आमदार झाल्यापासून त्यांच्या मागे अनेक विघ्ने पहावयास मिळत आहेत. कोरोना महामारीमुळे हे सारे झाले. पण गेली पाच-सहा महिन्यापासून कोरोना निर्बंध कमी केल्याने शहाजी पाटील यांनी विविध विकासकामांचा सपाटा लावलेला आहे. 


अशातच सांगोला पंचायत समितीची आमसभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी जनतेच्या प्रश्नाची चांगलीच सरबत्ती झाली. कामे होत नाहीत, अधिकारी कामे करीत नाहीत? सतत पैश्याची मागणी करतात यासह अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. माझे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. कोणतीही अडचण असूद्या, मी तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे.


आमचे काही खरे नाही. त्यामुळे प्रेमाने राहूया असे म्हणत बापूंनी अनेक चिमटेही घेतले. निवडणुकीवेळी निवडणुका झाल्या. तालुका समृध्द व्हायचाच असेल तर सर्वांना मिळून काम केले पाहिजे, असे म्हणत शहाजीबापू यांनी विरोधकांनाही आपल्या कवेत घेत सहकार्याचे आवाहन केले.


पंढरपुरातील भाषणाची आठवण

पंढरपुरात मागील काही महिन्यांपूर्वी झालेले शहाजीबापूंचे भाषण तुफान गाजले होते. आमदार म्हणून निवडून येण्यात राष्ट्रवादीचा उघड पाठिंबा होताच. शिवाय शेकाप, भाजपचीही चांगली मदत झाल्याची कबुली त्यांनी दिली होती. त्या भाषणाची आठवण त्यांच्या सांगोला येथील भाषणात झाली.


नेत्यांच्या एकीचे दर्शन

सांगोला तालुक्यात इतर तालुक्यासारखा राजकीय संघर्ष कधीही पाहायला मिळाला नाही. भाई गणपतराव देशमुख हे अनेक दशके आमदार असताना त्यांच्यावर जाहीर टीका कोणीही केली नाही. सर्व नेते विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नेहमी एकाच व्यासपीठावर दिसायचे. कालच्या आमसभेत हेच दृश्य पुन्हा दिसले. मात्र भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांची उणीव मात्र प्रकर्षाने जाणवली.

Post a Comment

0 Comments