google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुहूर्त ठरला! सोलापूर जिल्ह्यातील चार वाळू घाटातून वाळू उपशाला 'या' दिवसापासून प्रारंभ होणार

Breaking News

मुहूर्त ठरला! सोलापूर जिल्ह्यातील चार वाळू घाटातून वाळू उपशाला 'या' दिवसापासून प्रारंभ होणार

 मुहूर्त ठरला! सोलापूर जिल्ह्यातील चार वाळू घाटातून वाळू उपशाला 'या' दिवसापासून प्रारंभ होणार

वाळू लिलावात सहभाग घेतलेल्या चौधरी पॉवर प्रोजेक्टने ३ कोटी ५३ लाख रुपये तसेच मंगलमूर्ती स्टोन क्रशरने १२ कोटी ३४ लाख रुपये भरले असून गुढीपाडव्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील चार वाळू घाटातून वाळू उपशाला प्रारंभ होणार आहे.


चौधरी पॉवर प्रोजेक्ट तसेच मंगलमूर्ती क्रशरने शंभर टक्के लिलाव रक्कम भरले असन दोघेही लवकरच पर्यावरण विभागाचे ना हरकत पत्र सादर करणार आहेत , अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रतिसाद न मिळालेल्या चार वाळू घाटांचा लिलाव झाला असून यातून प्रशासनाला २९ कोटींचा महसल मिळणार आहे. चार मक्तेदारांनी रॉयल्टीची शंभर टक्के रक्कम जमा केली असून, लवकरच त्यांना वाळू घाटाचा ताबा मिळणार आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली.


यांनी लावली बोली

मिरी-तांडोर साठा क्रमांक १ मंगलमूर्ती स्टोन क्रेशर यांनी १२.३४ कोटी , मिरी – सिद्धापूर साठा क्रमांक १ शिक्षंदा लाइफ स्टाइल यांनी ७.९ २ कोटी . घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक १ चौधरी पॉवर प्रोजेक्ट यांनी ३.५३ कोटी तर घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक २ प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी ५.११ कोटी रुपयास बोली अंतिम झाली. यापैकी शिक्षंदा व प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी शंभर टक्के रक्कम यापूर्वीच भरली आहे. मिरी – तांडोर येथील साठ्यास सर्वाधिक १२ कोटी ३४ लाख रुपये मिळाले असून , मंगलमूर्ती स्टोन क्रेशरने हा ठेका घेतला आहे.

Post a Comment

0 Comments