सोलापूर:जनावरांच्याआतड्यांपासून'डालडा'बनणाऱ्या सील केलेल्या कारखान्यात "रात्रीस खेळ चाले"
सोलापुरात जनावरांच्या आतड्या-चरबी पासून बनावट डालडा बनवणाऱ्या फॅक्टरीवर पोलिसांनी धाड टाकून ती सील केली होती मात्र आता या कारखान्यात दिवसा नाही तर रात्रीस खेळ चालत असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या भोगाव कचरा डेपो च्या परिसरात बनावट डालडा बनवणाऱ्या फॅक्टरीवर पोलिसांनी छापा टाकून फॅक्टरी सील केली होती . ट्रिपल ट्रेडिंग कंपनी नावाची फॅक्टरी आहे.त्या फॅक्टरी बाबत परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या, या फॅक्टरी मुळे अतिशय घाणेरडा वास येतो, परिसरात दुर्गंधी पसरली आहे, नागरिकांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे.अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार विशेष शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी रेड मारली. यावेळी हा कारखाना इम्रान कुरेशी नावाच्या इसमाचा असल्याचं समोर आलं होतं. शेजारी असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीचा फायदा घेऊन हा कारखाना चालवला जातो. कारखाना सील केला असताना तो पुन्हा कुणाला न कळता गुपचूप सुरू करण्यात आला आहे. दिवसभर इथे काहीच केले जात नाही. जनावरांची आणलेली चरबी आतडे हे रात्री भट्टी सुरू केली जाते त्या सर्व मोठ्या कढई मध्ये टाकून भट्टी पेटवतात आणि निघून जातात. ते रात्रभर उकळून सकाळी आठते.रात्री परिसरातील नागरिक झोपेत असल्याने कुणाला काही समजत नाही. दिवसा भट्टी बंद, वास नाही त्यामुळे दिवसही संशय येत नाही, वास येत नाही. दिवसा तेवढा डालडा सारखा प्रकार डब्यात भरून गाड्या पाठवल्या जातात अशी माहिती समोर आली आहे. परिसरातील शेतकरी घाबरून कुणाला सांगत नाहीत. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून हे सर्व सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

0 Comments